मुंबई 2 सप्टेंबर : आजकाल कोणताही कार्यक्रम असला तरी देखील लोक नाच-गाण्याचा कार्यक्रम ठेवतात. कारण त्याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. अशातच लोक देखील संधीचा चांगला फायदा घेतात आणि आपल्या जीवनाचा आनंद उचलतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये एक काका डान्स करण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. परंतू त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही, ज्यामुळे त्यांना सर्वांसमोर लाजिरवाणं व्हावं लागलं. काकांशी संबंधित एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते डान्स करण्यासाठी इतके उत्सुक आहेत की ते स्टेजवर चढतात. इतकंच नाही तर ते स्टेजवर उपस्थित डान्सर्ससोबत डान्स करू लागतात. हे वाचा : कार नाही… एवढ्या लोकांसाठी तर बसची गरज; पण याने तर चक्कं बाईकवर सगळ्यांना बसवलं, पाहा Video हे काका नृत्यात इतके मग्न होतात की त्यांना दुसरे काही लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
परंतू त्यानंतर जे काकांसोबत घडतं ते फारच वाईट आहे. कारण तेव्हा काकू चप्पल हातात घेऊन स्टेजवरती येतात आणि या काकांना चांगलेच तारे दाखवते. काकू सर्वासमोर काकांना असं काही मारते की, लोकांनी आता हे मनात ठरवून टाकलं की काकांचं आता घरी जाऊन काही खरं नाही. हे वाचा : VIDEO : मेरी शादी करवाओ! तरुणामागे पळत सुटली तरुणी; लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा हा व्हिडिओ sakhtlogg नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे नेटिझन्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.