मुंबई 23 डिसेंबर : हिवाळ्याचा ऋतू अनेकांना आवडत असला तरी देखील या महिन्यात अंघोळ करण्याची मात्र पंचायतच असते. खरंतर भारतात असे अनेक भाग आहेत, जेथे हिवाळ्यात खूप जास्त थंडी असते. त्यामुळे त्यांना आपल्या नित्याची काम करणं देखील कठीण होऊन बसतं. असे अनेक लोक आहे जे हिवाळ्यात अंघोळच करत नाहीत किंवा त्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबतात. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने थंडीमध्ये अंघोळ करण्यासाठी देसी जुगाड केला. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे ही पाहा : स्टाईल करणं महिलेला महागात पडलं, केसांची अशी अवस्था की… एकदा हा व्हिडीओ पाहा एका देसी माणसाचा हिवाळ्यात पाण्याशिवाय आंघोळ करतानाचा एक मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. अल्गारी फकीर नावाच्या चॅनलने हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओची सुरुवात एका व्यक्तीने अंगावर पाणी ओतण्याच्या अभिनयातून केली. त्याने पुढे अंगावर साबण लावण्याची कृती केली आणि मग पुन्हा अंगावर पाणी टाकण्याचं नाटक केलं.
खरंतर या व्यक्तीच्या अंगावर पाण्याचा एकही थेंब पडत नाही आणि तो असाच आपल्या अंगावर पाणी ओतू लागतो.
पाण्याशिवाय आंघोळ केल्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आंघोळ न करता थंडीने आंघोळ करण्याचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. थंडीत आंघोळ करण्याचा हा अप्रतिम देसी जुगाड असल्याचेही अनेकांनी सांगितले. हा जुगाड आपणही पाळला पाहिजे.