जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्टाईल करणं महिलेला महागात पडलं, केसांची अशी अवस्था की... एकदा हा व्हिडीओ पाहा

स्टाईल करणं महिलेला महागात पडलं, केसांची अशी अवस्था की... एकदा हा व्हिडीओ पाहा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा परिणाम देखील इतका भयंकर झाला आहे की, कोणासोबत असं घडावं असा आपण विचार देखील करु शकणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 23 डिसेंबर : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहे. त्यामुळे बहुतांश तरुण वर्ग हा पार्टीच्या तयारीला लागला आहे. कोणी नवीन कपडे तर कोणी हेअर स्टायलिंग या सगळ्याकडे वळलं आहे. त्यात मुलींना बऱ्याचदा पूर्ण मेकओव्हर करायला आवडतो. मग ते काही तरी वेगळे प्रयोग करु पाहातात. असाच प्रयोग एका महिलेनं केला आणि तो असा काही फसला की आता ती संपूर्ण आयुष्यभर ते विसरणार नाही. हो कारण त्याचा परिणाम देखील इतका भयंकर झाला आहे की, कोणासोबत असं घडावं असा आपण विचार देखील करु शकणार नाही. या महिलेनं केस कलर करण्याचं ठरवलं, याला हायलाइट देखील म्हणतात. ते करण्यासाठी ही महिला सलोनमध्ये गेली. पण याचा परिणाम भलताच झाला. हे ही पाहा : Viral Video : ख्रिसमस डेकोरेशनचा असा फसला प्लान, क्रॉस घेऊन आला तरुण आणि… खरंतर असे अनेक तरुण मंडळी आहेत, जी फॅशन म्हणून असे प्रयोग करायला जातात. पण याचा परिणाम बऱ्याचदा विचित्रच होतो. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचा दिसत आहे. जिथे एक महिला केसांना हायलाईटचं क्रिम लावून बसलेली दिसत आहे. तेव्हा या महिलेच्या डोक्याची त्वचा अचानक जळ-जळू लागते. ती सलोनमधील कर्मचाऱ्यांना सांगते. त्यानंतर ते या महिलेला केस धुण्यासाठी घेऊन जातात. तेव्हा ते केस धुताना पाहातात की, या महिलेचे केस अचानक गळू लागले आहे. त्यांना हे कळून चुकलं की त्यांनी वापरलेल्या केमिकलमुळे हा सगळा प्रकार घडला आहे.

जाहिरात

सलून मधील हेअर स्टायलीश या महिलेचे केस धुत राहिले आणि तिचे केस यामुळे गळत राहिले. व्हिडीओ पाहून तुम्हाला हा सगळा प्रकार लक्षात येईल. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम hairsalonfeed नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. त्याला 68 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात