नवी दिल्ली, 12 जून : कॉफी पिणं कोणाला नाही आवडत? पण बटर टाकून बनवलेली कॉफी तुम्ही कधी प्यायली आहे का..? हो, कॉफीमध्ये बटर हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जुन्या दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला एक माणूस बटर कॉफी विकतो. (viral video) आज काल लोक प्रसिद्धी मिळावी म्हणून काय काय करत राहतात. काही दिवसांपूर्वी दुधातली मॅगी व्हयरल झाली होती. त्यानंतर चॉकलेट डोसा आणि आता बटर कॉफी. (butter coffee viral video) आपल्या देशात बहुतांश लोक हे दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. कॉफी प्रेमी हे तर कॉफी पिण्याचं निमित्त शोधत असतात. आपल्या चवीच्या आवडीप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारची कॉफी पिणं पसंत करतात. म्हणूनच आजकाल कॉफीमध्ये बरेच प्रकार उपलब्ध झाले आहेत. तुमच्यापैकीही बर्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीचा आस्वाद घेतला असेल. पण तुम्ही कधी बटर कॉफी ट्राय केली आहे का? हेही वाचा Shocking! डेंजर आइसलँडवर व्हॉलीबॉल; ज्वालामुखीतून धगधगता लाव्हा वाहू लागला आणि.. कॉफीमध्ये बटर हे एकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जुन्या दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला एक माणूस बटर कॉफी विकतो. (food blogger shares butter coffee on instagram)
अमर सिरोही हा फुड ब्लॉगर जामा मशिदीजवळ गेला होता तेव्हा त्यानं या बटर कॉफीचा आस्वाद घेतला. त्यानं आपला हा आगळा अनुभव एका इंस्टाग्राम पेजवर शेअर केला. बटर कॉफीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला असून या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना हे प्रकरण भावलं तर काहींनी बटर कॉफीबद्दल आपली नारजी व्यक्त केली आहे. (Delhi street food butter coffee) असीमद्दीन असे या कॉफी विक्रेत्याचे नाव आहे. त्यानं सांगितलं की गेल्या 20 वर्षांपासून तो बटर कॉफी विकत आहे. असीमद्दीनने एका काचेच्या ग्लासात दूध घेउून त्यात कॉफी पावडर, साखर आणि बटर घालून गरम केलं त्यानंतर त्याने त्यावर कोको पावडर टाकली आणि कपात बटर कॉफी सर्व्ह केली. हेही वाचा वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL जेव्हा हा व्हिडिओ पाहिले गेला तेव्हा एकाने लिहिलं, ‘आता हेच दिवस बघायचे बाकी आहेत’. तर दुसऱ्यानं लिहिलं की माहित नाही आणखी काय-काय नवीन गोष्टी पाहायला मिळतील…’