मुंबई, 30 मार्च : आजकाल प्रत्येक जण आपल्या फिटनेसबाबत (Fitness) जागरूक आहे. आहार, व्यायाम याच्या मदतीने फिट राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. अनेकांना तर फिटनेसचं इतकं वेड असतं की दिवसरात्र ते यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. बरं फिटनेस हा आता फक्त माणसांपुरताच मर्यादित राहिला नाही बरं का. प्राण्यांमध्येसुद्धा आता फिटनेसची क्रेझ दिसून येते आहे. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (Susanta nanda) यांनी आपल्या ट्विटवर एक मस्त व्हिडीओ शेअर केला आहे. एका मांजराचा हा व्हिडीओ (Cat video) आहे. ज्यात एक मांजर एक्सरसाइझ (Cat exercise) करताना दिसते आहे. फिटनेस फ्रिक (Fitness freak cat) असं कॅप्शनही दिपांशू यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
Fitness freak... pic.twitter.com/ZTaeDe2Lkz
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 29, 2021
व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर एक कार उभी आहे. कारच्या मागे उजव्या बाजूच्या चाकाजवळ एक मांजर आहे. ते जमिनीवर पाठीवर आडवं पडलं आहे. गाडीला तिने आपले मागील दोन्ही पाय लावले आहेत आणि पोटातून वाकण्याचा ती प्रयत्न करते आहे. जसं आपण क्रंच मारतो अगदी तशीच एक्सरसाईझ ही मांजर करते आहे.
हे वाचा - टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video
मांजर तशी थोडी लठ्ठच दिसते आहे. कदाचित तिलाही लठ्ठपणामुळे टेन्शन आलं असावं आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी ती असं करत असावी. अगदी वेगाने ती क्रंच मारताना दिसते आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रियादेखील येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cat, Fitness, Funny video, Other animal, Pet animal, Social media viral, Types of exercise, Viral, Weight gain