मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डेंजर आइसलँडवर व्हॉलीबॉल; ज्वालामुखीचा उद्रेक झाला, धगधगता लाव्हा वाहू लागला आणि... Shocking Video

डेंजर आइसलँडवर व्हॉलीबॉल; ज्वालामुखीचा उद्रेक झाला, धगधगता लाव्हा वाहू लागला आणि... Shocking Video

ज्वालामुखीच्या जवळच काही तरुणांनी व्हॉलीबॉल खेळण्याचं (playing volleyball near erupting volcano) धाडस केलं.

ज्वालामुखीच्या जवळच काही तरुणांनी व्हॉलीबॉल खेळण्याचं (playing volleyball near erupting volcano) धाडस केलं.

ज्वालामुखीच्या जवळच काही तरुणांनी व्हॉलीबॉल खेळण्याचं (playing volleyball near erupting volcano) धाडस केलं.

आईसलँड, 30 मार्च : सुमारे 800 वर्षे सुप्तावस्थेत असलेला दक्षिण-पश्चिमी आईसलॅण्डमधील (Iceland) रिक्झाव्हेक द्वीपकल्पातील ज्वालामुखीचा (Volcano) गेल्या शुक्रवारी उद्रेक झाला. नैसर्गिक चमत्कारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेटावरील हा ज्वालामुखीचा उद्रेक पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरत आहे. हे दुर्मिळ दृष्य पाहण्यासाठी हजारो आईसलॅंडर्स उद्रेक झालेल्या ठिकाणी जात आहेत आणि तिथं काहीतरी साहसी करण्याचा प्रयत्नही करत आहेत.

आइसलँडमधील ज्वालामुखीजवळी असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात ज्वालामुखीच्या जवळ काही लोक चक्क व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

व्हिडीओत पाहू शकता एकिकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यातून धगधगता, उकळता, तप्त असा लाव्हा बाहेर येतो आहे. हा लाव्हा वाहू लागला आहे. तर दुसरीकडे या ज्वालामुखीपासून अवघ्या काही अंतरावर दूर एक ग्रुप अगदी मजेत व्हॉलीबॉल खेळत आहे. त्यांना थोडीही भीती वाटत नाही आहे.

हे वाचा - टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video

हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडीओ पाहून तसा बहुतेकांना धक्काच बसला आहे. पण काही जणांनी यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. एका ट्विटर युझरने तर व्हॉलीबॉल नाही लाव्हाबॉल म्हणा, अशी कमेंट केली आहे. दरम्यान हा असा पहिलाच व्हिडीओ नाही. याआधी याच ज्वालामुखीच्या गरम लाव्हावर (Lava) काही लोक चक्क (Cooking) स्वयंपाक करतानाही दिसले.

" isDesktop="true" id="535449" >

व्हायरल झालेल्या व्हिडीओत वैज्ञानिक उद्रेक झालेल्या ठिकाणाचा अभ्यास करताना दिसत असून, काही जण ज्वलंत भूकवचावर हॉटडॉग (Hotdog) शिजवण्याचा प्रयोग करीत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका वैज्ञानिकांच्या गटानं येथील तापमान किती उच्चांकी हे तपासण्यासाठी जमा झालेल्या पिवळ्या लाव्हावर काही सॉसेज ग्रील्ड करण्याचा निर्णय घेतला.

" isDesktop="true" id="535449" >

हॉटडॉग्जसाठी ब्रेड अल्युमिनियमच्या फॉईलवर ठेवला असून सॉसेस साठी रोल शिजवण्यासाठी वितळलेल्या पृष्ठभागावर सोडल्याचे व्हिडीओत दिसत आहेत.

हे वाचा - 'मिसळीबरोबर पाव की ब्रेड' यावर माहिश्मतीला होणार युद्ध, पाहा काय 'कट' शिजतोय कट

अशा स्पॉटवर स्वयंपाक करणं फारसं नवीन नसावं. परंतु तरीदेखील ऑनलाइन युजर्सनी या व्हिडीओत दिसणाऱ्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हे शिजवलेले पदार्थ पुरेसे सुरक्षित आहेत की नाही याबाबत देखील अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Iceland, International, Shocking viral video, Viral, Viral videos