Home /News /entertainment /

दिल, दोस्ती आणि लग्न! सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात?

दिल, दोस्ती आणि लग्न! सखी गोखले कशी पडली सुव्रत जोशीच्या प्रेमात?

अभिनेता सुव्रत जोशीसोबतचं तिचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. (Sakhi Gokhale Suvrat Joshi Love story) तर मग पाहूया सखी आणि सुव्रतची अनोखी लव्हस्टोरी...

    मुंबई 27 जुलै: दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सखी गोखले (Sakhi Gokhale) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज सखीचा वाढदिवस आहे. (Sakhi Gokhale birthday) 28 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सखी अभिनयासोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. विशेषत: अभिनेता सुव्रत जोशीसोबतचं तिचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. (Sakhi Gokhale Suvrat Joshi Love story) तर मग पाहूया सखी आणि सुव्रतची अनोखी लव्हस्टोरी... HBD Kriti Sanon: इंजिनियरिंग करणारी तरुणी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री? सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट दुनियादारी या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्याआधी ते एकमेकांना फेसबुकवरून ओळखत होते. परंतु मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांची खुप चांगली मैत्री झाली. पुढे अमर फोटो स्टुडियो या नाटकात त्यांनी एकत्र काम केलं. अन् या नाटकादरम्यानच दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सखी शिक्षणासाठी लंडनला गेली. याच दरम्यान दोघांमध्ये रिलेशनशिप असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु दोघांनीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. ‘ताई तू मुंबई पोलिसांचा विचार कर’; राज कुंद्राला पाठिंबा देणारी गहना पुन्हा ट्रोल 11 एप्रिल 2019 रोजी त्यांनी लग्न करून चाहत्यांना एकच धक्का दिला. अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. मुंबई जवळच्या सगुणाबाग मध्ये त्यांचा विवाह पार पडला. जवळचे मित्र आणि नातेवाईक अश्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला, त्यानंतर मुंबईत मोठ्या दिमाखात रिसेप्शन पार पडला. सध्या दोघंही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने लंडनमध्येच आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Marathi actress, Sakhi gokhale

    पुढील बातम्या