वॉशिंग्टन, 04सप्टेंबर : पॅराशूटनं किंवा एअर बलूनच्या माध्यमातून हवेत उडण्याचा आनंद प्रत्येकाला घेण्याचे स्वप्न असते. मात्र कधी खूप साऱ्या फुग्यांचा वापर करून हवेत उडाल्याचे पाहिले आहे? असं खरच घडलं आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध जादूगार डेव्हि़ड ब्लेन एक परफॉर्मर आहे. डेव्हिड असे काही स्टंट करतो, जे पाहून तुम्हाला विश्वासही बसणार नाही. नुकताच डेव्हिडनं फुग्याचा वापर करून चक्क 25 हजार फूटांवर गेला. या खतरनाक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या स्टंटला डेव्हिडनं Ascension असे नाव दिले आहे. याचा अर्थ आहे, एखाद्या उंचीवर चढणे. 47 वर्षीय डेव्हिडनं हा स्टंट केल्यानंतर, "मला हे एखाद्या जादूप्रमाणे वाटले. मला असं वाटलं की मी हवेत वाहत आहे". हा स्टंट डेव्हिडनं एकट्यानं नाही तर त्याच्या सोबत असलेल्या संपूर्ण टीमनं मिळून केला आहे.
वाचा-गरम व्हायला लागलं म्हणून इर्मजन्सी डोअरमधून विमानाबाहेर आली महिला
वाचा-फ्लाइट अटेंडंटनं विमानात मारली फ्लिप, VIDEO मुळे एका रात्रीत झाली स्टार
या स्टंटचा मुख्य भाग म्हणजे 24 हजार 900 फूटांवर गेल्यानंतर डेव्हिडनं फुगे सोडले, आणि पॅराशूटच्या मदतीने तो जमिनीवर आला. 24 हजार 900 फूटांवर साधारणत: विमानांची उंची असते. डेव्हिडनं याआधीही रिस्की स्टंट केले आहे. टाइम्स स्क्वेअर डेव्हिड दोन दिवस बर्फात एका ब्लॉकमध्ये राहिला होता. जवळजवळ 68 तास डेव्हिड बर्फाच्या ब्लॉकमध्ये राहिला होता.
वाचा-आकाशातून एक दगड खाली पडताच अख्खं गाव झालं श्रीमंत, वाचा नेमकं काय घडलं
डेव्हि़डनं आपल्या या स्टंटचा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रिम केला होता. या व्हिडीओला युट्यूबच्या इतिहासात सर्वात जास्त views मिळाले. या व्हिडीओला 7 लाख 70 हजार views मिळाले. मुख्य म्हणजे या स्टंटसाठी डेव्हिडनं तब्बल 2 वर्ष तयारी केली होती.