नवी दिल्ली 11 जुलै: एका महिलेनं आपल्या मुलीचा आईची नक्कल करतानाचा एक व्हिडिओ (Woman Shared Hilarious Video of Her Daughter) LinkedIn वर एप्रिल महिन्यात शेअर केला होता. मात्र, याला लोकांची इतकी पसंती मिळेल, असं या मुलीची आई Colleen Chulis हिला कधीही वाटलं नव्हतं. पण तीन महिन्यांनंतर ही व्हिडिओ क्लिप तुफान व्हायरल (Viral Video) झाली. या व्हिडिओ 5 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 15 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील आठ वर्षांची एक चिमुकली आपल्या आईच्या वर्क फ्रॉम होममधील कामाच्या पद्धतीची नक्कल (Daughter Imitates Her Mother on WFH) करत आहे. VIDEO: लग्नात नवरीबाईला मिळालं भलतंच गिफ्ट; उघडून बघताच उडाला चेहऱ्यावरचा रंग 1 मिनिट आणि 23 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ही मुलगी आपल्या आईच्या डेस्कवर बसून कॉम्प्यूटरवर काम करण्याचं नाटक करताना दिसत आहे. यानंतर ती एक कॉल आल्याचं आणि तो उचलण्याचं नाटक करते. यानंतर ती हातात नोटपॅड घेऊन महत्त्वाचे मुद्दे लिहित असल्याचं दाखवते, अगदी तसंच जसं तिचं आई करते. मुलं अचानक आतमध्ये आल्यावर आई कशी प्रतिक्रिया देते याची नक्कलही अडिल्ले हिनं हुबेहूब केली आहे.
Crazy - I posted a silly video of my daughter imitating me working on linked in and have 5M+ views 2 days later #workfromhome https://t.co/8QB7x1YPnM
— Colleen Chulis (@ColleenChulis) April 18, 2021
चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा गेला तोल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO अडिल्लेच्या आईनं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, की ‘माझ्या आठ वर्षाच्या मुलीनं म्हटलं की ती माझी नक्कल करणार आहे. तिनं महिल्याच टेकमध्ये हे अगदी परफेक्ट केलं. यातील बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबतही रिलेट करणाऱ्या असतील. मागील एका वर्षात कोरोनामुळे जीवनशैलीत अनेक बदल झाले आणि या व्हिडिओमध्ये तेच दिसून येतं’. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून नेटकऱ्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.