• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर महिलांना कापावी लागतात बोटं, जाणून घ्या या विचित्र प्रथेबद्दल

कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर महिलांना कापावी लागतात बोटं, जाणून घ्या या विचित्र प्रथेबद्दल

कधी तुम्ही त्या परंपरेबद्दल ऐकलंय का? ज्यात घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर घरातील महिला आपली बोटे कापतात?

 • Share this:
  नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : जगभरात अनेक अजब प्रथा आणि परंपरा (Weird Tradition) आहेत, ज्याबद्दल जाणूनच सगळे हैराण होतात. भारतासोबतच असे अनेक देश आहेत जेथील लोक आपल्या परंपरा सोडू इच्छित नाहीत. मात्र, काही परंपरा अशाही आहेत, ज्यावर तिथल्या सरकारनंही बंदी घातली आहे. कधी तुम्ही त्या परंपरेबद्दल ऐकलंय का? ज्यात घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर घरातील महिला आपली बोटे कापतात? (Dani Tribe Finger Amputation Rituals) आज आम्ही तुम्हाला अशाच अजब परंपरेबद्दल सांगणार आहोत. लोक आजही ही परंपरा मानतात आणि याचं पालनही करतात. हे अत्यंत धक्कादायक आहे. आपण पाहिलं असेल की जेव्हा एखाद्याच्या घरातील सदस्याचं निधन होतं तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य अतिशय भावनिक होतात. त्यांचं दुःख कमी करण्यासाठी सांत्वन करायला जवळचे नातेवाईकही समोर येतात. मात्र. इंडोनेशियामधील एका समजात लोक यापेक्षाही जास्त वेदना सहन करतात. कारण या घरातील महिलांना आपली बोटं कापावी लागतात. लॉलिपॉप खाऊन चिमुकलीची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का news.com.au च्या वृत्तानुसार, दानी समाजातील महिलांना मानसिक वेदनांशिवाय शारीरिक वेदनाही सहन कराव्या लागतात, जेव्हा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं. घरातील सदस्याच्या निधनानंतर या महिलांच्या बोटांचा वरचा अर्धा भाग कापला जातो. असं मानलं जातं, की बोटं कापल्यानं मृत व्यक्तीचा अशांत आत्मा दूर राहतो, सोबतच हे दुःखाचं एक प्रतिक मानलं जातं. इतकंच नाही तर काही बाळांची बोटंही त्यांच्या आईकडून कापली जातात. या प्रथेला इकिपलिन (Ikipalin) म्हटलं जातं. बोटं कापण्याच्या या असामान्य प्रथेवर इंडोनिशाच्या सरकारने काही वर्षांपूर्वीच बंद घातली आहे. या समाजातील अनेक मोठ्या महिलांना त्यांच्या हातांवरुन ओळखलं जातं. असं म्हटलं जातं, की अजूनही गुप्त पद्धतीनं ही प्रथा सुरूच आहे. झोपाळूंसाठी सुरू झाली विशेष बससेवा, 4 हजार मोजा आणि 5 तास झोपा अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या जातीचे लोक पश्चिमी न्यू गिनीच्या उंच आणि घनदाट भागात राहतात. 1938 मध्ये अमेरिकी एक्सप्लोरर रिचर्ड आर्कबोल्डने जेव्हा या भागात उड्डाण केलं तेव्हा याची माहिती मिळाली.
  Published by:Kiran Pharate
  First published: