मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कधीही पाहिला नसेल असा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

कधीही पाहिला नसेल असा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती अतिशय उत्तम पद्धतीने बॅल्नस साधून आपले दोन्ही पाय हवेत घेऊन उंचावर बनवण्यात आलेल्या ब्लॉक्सवरुन उड्या मारत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 21 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेकदा स्टंटचे निरनिराळे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही तो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. तुम्ही असा स्टंट व्हिडिओ याआधी कधीही पाहिला नसेल.या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता अतिशय घातक ठिकाणी स्टंट करताना दिसतो (Dangerous Stunt Video Viral).

नदीच्या पाण्यातच मगरीचा सिंहावर हल्ला; जबरदस्त लढाईचा LIVE VIDEO, पाहा शेवट

हा व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की घातक स्टंट करणं वेडेपणा आहे, मात्र हा स्टंट करणं जीवघेणं आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती हाफ पॅन्ट आणि टोपी घालून खतरनाक स्टंट करताना दिसतो. या व्यक्तीचा बॅलन्स बघून सगळेच अवाक झाले.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक व्यक्ती अतिशय उत्तम पद्धतीने बॅल्नस साधून आपले दोन्ही पाय हवेत घेऊन उंचावर बनवण्यात आलेल्या ब्लॉक्सवरुन उड्या मारत आहे. यादरम्यान थोडाही बॅलन्स बिघडला असता तरी हा व्यक्ती कित्येक फूट खाली कोसळला असता. हा स्टंट करण्यासाठी त्याने अतिशय मेहनत आणि सराव केला आहे. याच कारणामुळे तो अतिशय सहजपणे हा हैराण करणारा स्टंट करत आहे.

चिखलात फोटोशूट करायला निघालेले नवरी-नवरदेव; पाय घसरताच झाली भलतीच फजिती, Video

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा व्यक्ती एकदाही न थांबता अगदी वेगात हा स्टंट करतो. यादरम्यान जर तो खाली कोसळला असता तर त्याचे हातपायही तुटू शकत होते. हैराण करणारा हा व्हिडिओ parkour_tribe नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 20 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Shocking video viral, Stunt video

पुढील बातम्या