मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणाने उंच इमारतीवरुन उडी घेतली अन्....; धडकी भरवणारा VIDEO VIRAL

तरुणाने उंच इमारतीवरुन उडी घेतली अन्....; धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Stunt Video Viral : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती इमारतीच्या छतावर उभा असल्याचं दिसतं. यानंतर काही वेळातच तो छताच्या अगदी काठावर जाऊन उभा राहतो

Stunt Video Viral : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती इमारतीच्या छतावर उभा असल्याचं दिसतं. यानंतर काही वेळातच तो छताच्या अगदी काठावर जाऊन उभा राहतो

Stunt Video Viral : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती इमारतीच्या छतावर उभा असल्याचं दिसतं. यानंतर काही वेळातच तो छताच्या अगदी काठावर जाऊन उभा राहतो

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 05 जानेवारी : स्टंट करणं प्रत्येकालाच शक्य नसतं. कारण यासाठी भरपूर सरावाची गरज भासते. यानंतरच यात माणूस परफेक्ट होतो. हे करताना जराही चूक झाली तर स्टंट फेल होण्यासोबतच अनेकदा गंभीर दुखापतही होते. आजकाल जगभरात स्टंट करणाऱ्यांचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. विशेषतः युवकांमध्ये याबाबत अधिकच क्रेज पाहायला मिळते. सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ एकदम परफेक्शन असणारे असतात तर काही व्हिडिओमध्ये स्टंट फेल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Stunt Video) होत आहे.

पाहुण्यांनी नवरीला हवेत फेकलं, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा Wedding Video

या व्हिडिओमधील तरुणाचा स्टंट पाहून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती इमारतीच्या छतावर उभा असल्याचं दिसतं. यानंतर काही वेळातच तो छताच्या अगदी काठावर जाऊन उभा राहतो. यानंतर तो कोलांटी उडी घेऊन छतावर दुसऱ्या बाजूला जातो. व्हिडिओमध्ये पुढे दिसतं की दुसऱ्या बाजूला खाली अजिबातही भिंत नाही. त्यामुळे थोडाही बॅलन्स बिघडला असता तरी हा व्यक्ती थेट उंच इमारतीवरून खाली कोसळला असता.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही parkour_tribe नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर याआधीही अनेकदा तुम्ही निरनिराळे स्टंट व्हिडिओ पाहिले असतील. मात्र इतका भयानक स्टंट व्हिडिओ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल.

स्टंट करत असतानाच अचानक कारचे 2 तुकडे झाले अन्...; Shocking Video

व्हिडिओवर कमेंट करत एका व्यक्तीने म्हटलं, हे तर सरळसरळ मृत्यूला निमंत्रण देणं आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, असं काही करण्याआधी हे लोक आपल्या आई-वडिलांचा विचारही करत नाहीत. याशिवायही इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काहींनी व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं की या स्टंटदरम्यान तरुणाचा जीवही जावू शकत होता.
First published:

Tags: Shocking video viral, Stunt video

पुढील बातम्या