Sali Jiju News: सासरच्या घरी मेव्हण्याला (Jiju) कंपनी देण्यात पहिलं नाव असतं मेव्हणीचं. मेव्हणीच मेव्हण्याला चांगली कंपनी देते. आणि काळजीदेखील घेते. मेव्हणा पहिल्यांदा सासरी येणार असेल तर त्याच्या तयारीत मेव्हणी पुढाकार घेते. अशाच लग्नानंतर एक मेव्हणा पहिल्यांदाच आपल्या सासरी पोहोचला. त्यावेळी मेव्हणीने अनोख्या पद्धतीने त्याचं स्वागत केलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. मेव्हणीने मेव्हण्यासोबत केला व्हिडीओ शूट… तरुण आपल्या पत्नीसह सासरी (Wife and husband) पोहोचला. मात्र तिथं काय होणार याबद्दल त्याला अजिबातच कल्पना नव्हती. तेथे मेव्हणी मेव्हण्याचं स्वागत करण्यासाठी आतुर होती. तिने आपल्या अंदाजात मेव्हण्याचं स्वागत केलं.
आकृती सिंहने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आकृतीच्या इन्स्टाग्रामवर विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं तिच्या अकाऊंटवरुन दिसत आहे.
मेव्हण्यासोबतचे अनेक व्हिडीओ तिच्या अकाऊंटवर दिसत आहे. त्याशिवाय बहिणीसोबत देखील अनेक फिल्मी गाण्यावर तिने डान्स केल्याचं तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन दिसून येत आहे. हे ही वाचा- पोटात ओरडू लागले कावळे; काही खायला न मिळाल्याने भुकेल्या नवरीने रस्त्यातच…. कसं पाहता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातही दीर-वहिनी यांचे डान्स व्हिडीओदेखील अनेकदा पाहायला मिळतात. जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा तेथे मोठ्या संख्येने लोक व्हिडीओ शूट करून पोस्ट करीत होते. मात्र सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर अनेक जण निराश झाले होते. मात्र ही जागा आता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने घेतली आहे. येथे सिनेस्टारपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत लोक व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात.