जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking: रस्ते अपघाताचे 5 असे व्हिडीओ, जे पाहून तुम्हाला झोप लागणार नाही

Shocking: रस्ते अपघाताचे 5 असे व्हिडीओ, जे पाहून तुम्हाला झोप लागणार नाही

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला या संबंधीत काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असेच काही सोशल मीडियावरील रस्ते अपघाताचे व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 08 जानेवारी : रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण इथे कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. सोशल मीडियावर आपल्याला या संबंधीत काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असेच काही सोशल मीडियावरील रस्ते अपघाताचे व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. हे अपघात फारच धोकादायक आहेत. परंतू ते पाहून तुम्हाला रस्त्यावरुन जाताना कोणती चुक करु नये हे लक्षात येईल. १. ट्राकच्या दोरीमुळे बाईकस्वाराला बसला फास

जाहिरात

तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ट्रकना दोऱ्या बांधलेल्या असतात. माल वाहून नेताना तो सुरक्षित राहावा, पडू नये यासाठी या दोऱ्या असतात. या व्हिडीओतील ट्रकलाही अशीच दोरी बांधली होती. गोण्यांनी भरून जाणारा हा ट्रक, ज्याची दोरी तुटली आणि त्यात हा बाईकस्वार अडकला. यामुळे हा अपघात घडला आहे. २. आई-वडिल पडले, पण बाळासह बाईक पुढे जात राहिली आणि…

रस्त्यावरील वाहनं वेगाने धावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने येतो आणि अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकतो. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी जागीच पडतात, मात्र दुचाकी पुढे जात राहते. यात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्या बाईकवर एक लहान मुलगा बसलेला आहे, तो खाली न पडता दुचाकीसोबतच पुढे जातो. नशीबाने या मुलाला काहीही झालेलं नाही. ३. लहान मुलाला स्कूटीवर बसवणं महागात पडलं; एका चुकीमुळे भयानक दुर्घटना, Live Video

जाहिरात

एक व्यक्ती स्कूटी चालवत आहे आणि त्याच्यासोबत एका मुलालाही घेऊन जात आहे. तो त्याच्या घरासमोर उभा आहे आणि कदाचित कोणीतरी येण्याची वाट पाहातोय. इतक्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येतो आणि तो बोलू लागतो. इतक्यात स्कूटीवर समोर बसलेला लहान मुलगा एक्सलेटरला हात लावतो. यामुळे स्कूटी वेगात पुढे जाते आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीसह खाली पडतो आणि मुलगा देखील पुढे जाऊन गाडीसह भिंतीला अदळतो. ४. मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही…

जाहिरात

या व्हिडीओच्या सुरुवातीला गाड्या चालताना दिसत आहेत. तेवढ्यात एका कारच्या मागून भरधाव वेगाने मोठं वाहन येताना दिसतं, या कारच्या मागे असलेल्या सगळ्या गाड्यांना हा ट्रक उडवत घेऊन आला. पण या सगळ्यात समोरच उभी असलेली कार मात्र थोडक्यात बचावली. पण हा अपघात फारच भयानक होता कारण यामध्ये अनेक गाड्यांचा चुरा झाला आहे. ५. थोडक्यात बचावली चिमुरडी, 10 सेंकद अन् गाडी चक्काचूर

चार वर्षांची मुलगी घरासमोर उभा असलेल्या कारमध्ये खेळत होती. मुलगी कारमधून उतरल्यानंतर ७ सेकंदात रस्त्यावरून आलेल्या एका वेगवान कारने उभा असणाऱ्या कारला धडक मारली. ही धडक इतकी जोरदार होती की यामुळे उभा असलेली कार उलटली. पण नशीबाने जवळच असलेल्या मुलीला काहीही दुखापत झाली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात