मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुण तरुणीकडून कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, Video पाहून अंगावर येईल काटा

तरुण तरुणीकडून कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, Video पाहून अंगावर येईल काटा

धक्कादायक व्हिडीओ

धक्कादायक व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमी आणि नेटकऱ्यांनी याला जोरदार ट्रोल केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असतात. लोकांना त्यांच्याशी खेळायला आवडते. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा प्रेमींची संख्या जास्त आहे. लोक त्यांच्या कुत्र्याशी लहान मुलांप्रमाणे खेळतात देखील. मात्र त्यांचा त्यांच्याकडील प्राण्यावर खुप प्रेम देखील असतं. पण यासगळ्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोन तरुणांनी कुत्र्याचा खेळ केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमी आणि नेटकऱ्यांनी याला जोरदार ट्रोल केलं आहे.

हे ही पाहा : Wired News : व्यक्तीनं दाताने तोडलं अजगराचं डोकं, त्यानंतर जे घडलं ते...

या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणीने कुत्र्याच्या पिल्लाचा खेळच केला आहे. ते दोघेही या पिल्लाला एखादा बावला किंवा निर्जीव वस्तु असल्यासारखे त्याच्याशी खेळत आहेत. जे पाहून तुम्हाला या दोघांचा राग येईल.

वास्तविक, हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अवनीश सरन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यातील प्राणी कोण आहे, असे कॅप्शन देखील त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणी एका लहान कुत्र्याच्या पिल्लाला फेकताना दिसत आहे. त्यांनी या पिल्लाची शेपटी देखील पकडून त्याला फिरवलं आहे.

कधी ते पिल्लाला त्याच्या शेपटीने फेकतात तर कधी त्याचे पाय धरून फेकतात. ते पिल्लू हैराण आणि घाबरले आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या शेवटी ते या पिल्लाला उंच फेकत असल्याचंही दिसत आहे की तो घाबरतो. तसेच या व्हिडीओत तरुण आणि तरुणी दोन्ही बाजूला पिल्लाचे हात पाय पकडून त्याला लटकवत फिरताना दिसत आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचाही यात सहभाग आहे. हा व्यक्ती व्हिडीओ शूट करताना असे आवर्जून सांगत आहे की असे करु नका, हा व्हिडीओ मनोरंजनासाठी केला गेला आहे. पण हे असं करनं अजिबात योग्य नाही. या सगळ्यात या पिल्लाचा मृत्यू देखील होऊ शकला आहे.

हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर लोकांनी जोरदार टिका केली आहे आणि या तरुणांवर कारवाई करण्यात यावी अशी देखील लोक मागणी करत आहेत.

First published:

Tags: Shocking, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral