जाहिरात
मराठी बातम्या / Viral / डोळे आणि हृदय काढले, कैद्यांनी जेलरला खाऊ घातले, जगातील धोकादायक जेल

डोळे आणि हृदय काढले, कैद्यांनी जेलरला खाऊ घातले, जगातील धोकादायक जेल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका भयानक तुरुंगाबद्दल सांगणार आहोत, जिथून कैद्यांनी इतर कैद्यांचे डोळे, हृदय काढले आणि ते तेथील जेलरला जबरदस्तीने खाऊ घालण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांपैकी तुम्ही ऐकले असेलच. आफ्रिकेतील गीतारामा तुरुंगात कैद्यांना एवढी मारहाण केली जाते की त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे या जेलला पृथ्वीवरील नरक म्हणतात. या छळाला कंटाळून कैदी स्वत:च आपल्या मरणाची याचना करतात. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका भयानक तुरुंगाबद्दल सांगणार आहोत, जिथून कैद्यांनी इतर कैद्यांचे डोळे, हृदय काढले आणि ते तेथील जेलरला जबरदस्तीने खाऊ घालण्यात आले. Viral Video : पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; शेवट पाहून नेटकरीही झाले भावूक हे प्रकरण ब्राझीलचे आहे. येथील बहुतांश तुरुंगांमध्ये अमली पदार्थ तस्करांची फौज असते, त्यांच्यात अनेकदा हाणामारी होत असते. मात्र 2017 मध्ये येथील अनेक कारागृहात कैद्यांचे दोन गट एकमेकांशी भिडले. प्रिमिरो कोमांडो दा कॅपिटल आणि कमांडो वर्मेल्हो यांनी अल्तामिरा तुरुंगात एकमेकांच्या गटावर हल्ला केला. 57 कैद्यांची हत्या झाली. त्यापैकी 39 कैद्यांचे शिरच्छेद करण्यात आले. अनिसिओ तुरुंगात 4 तुरुंग अधिकाऱ्यांनाही जीव गमवावा लागला. ब्राझीलच्या इतिहासातील हे सर्वात हिंसक हत्याकांड मानले जात होते. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारागृहात अंमली पदार्थांच्या व्यवसायावरून दंगल सुरू झाली. मात्र एका टोळीतील कैदी इतके वेडे झाले की, त्यांनी दुसऱ्या टोळीतील 13 कैद्यांचे डोळे काढले. 2 कैद्यांचे हृदय कापून टाकले. कैद्यांनी बळजबरीने तेथील तत्कालीन जेलरला एक डोळा खाऊ घातला. येथे 4 अधिकारीही मारले गेले. अल्तामिरा तुरुंगात 39 जणांचा मृत्यू झाला होता. इतर टोळीतील सदस्यांनी कैद्यांच्या सेलला आग लावली. शिवाय जे शस्त्र मिळाले ते वापरुन आणि गोळीबार करून हे कैदी संपूर्ण जेलचा ताबा घेऊ पाहात होते, तेव्हाच सुरक्षा कर्मचारी पोहोचले आणि त्यांचा हेतू उद्ध्वस्त झाला. संपूण जगातील देशांबद्दल बोलायचं झालं तर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त जेल आहेत. येथे प्रत्येक कारागृहात क्षमतेपेक्षा कितीतरी पट जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. यातील बहुतांश ड्रग माफिया आणि ड्रग्ज व्यसनी आहेत. त्यामुळे अनेकदा या जेलमध्ये वाद होतात. 1992 मध्ये साओ पाउलोच्या तुरुंगात प्रचंड दंगल झाली आणि त्यानंतर 100 हून अधिक कैदी मारले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात