मुंबई, 28 जून : आई सारखं प्रेम कधीच कोणी कोणावर करु शकत नाही. या प्रेमात ना कधी अपेक्षा असतात ना कधी स्वार्थ. आई आपल्या बाळासाठी तर आपल्या प्राणाची आहुती द्यायला देखील तयार असते. यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. अशाच एका पक्ष्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो आपल्या मुलांना वाचवण्यासाठी एका धोकादायक सापाशी भिडला. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. Viral Video : पुरामध्ये वाहून जात होती गाय, JCB चालकाच्या हुशारीमुळे वाचले प्राण पक्ष्याची पिल्लं खाण्यासाठी साप झाडावर चढला एका झाडाच्या खोडाला छिद्र पाडून पक्ष्याने त्याच्या आत (Snake Bird Fight Video) आपले घरटे बनवले होते. त्या घरट्यात अंडी आणि पिल्ले आहेत. तेव्हा त्या खोडाच्या आत साप हळूहळू घूसू पाहात होता. त्याची नजर पक्षांच्या पिल्लावरच होती. यावळे पक्षी बाहेरच होता. त्याने हे सर्व पाहिले आणि आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्यांने त्यांच्याशी लढण्याचा विचार केला. ही आई आपल्या पिल्लांसाठी सापाला दोन-तीने वेळा चावली देखील पण साप काही बाहेर आला नाही. अखेर त्या पक्षीने सापाला बाहेर ओढले, ज्यानंतर सापाने पक्षावर हल्ला केला आणि ते दोघेही झाडावरुन खाली पडले. आपल्या मुलांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून एका आईने स्वतःपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आणि धोकादायक असलेल्या सापाशी लढण्याचा निर्णय घेतला. अखेर यामध्ये एका आईचा अंत झाला. Viral : किंग कोब्राचं ऑपरेशन, पोटातून जे निघालं ते धक्कादायक व्हिडीओच्या शेवटी साप आणि पक्षी दोघेही खाली पडलेले तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये साप पक्षाला विळखा घालून बसला आहे. सापाने या आईला इथेच संपवलं आहे. हा व्हिडीओ @animals5s या हँडलवरून हा शेअर करण्यात आला आहे. आपल्या मुलांचे प्राण वाचवताना पक्ष्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने अनेक इंटरनेट वापरकर्ते भावूक होतात. या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि शेअर आले आहेत.
حاولت الأم منع الثعبان من دخول عشها ولكن باغتها الثعبان بهجوم خاطف ..
— عالم الحيوان (@animals5s) June 25, 2023
😌🔥 pic.twitter.com/WlWgNlXgmA
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, आई ही आई असते. त्याच्यासारखा जगात कोणी नाही. आणखी एका यूजरने लिहिले की, या पक्ष्याचे धैर्य पाहण्यासारखे आहे.