मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दीपिकाच्या गाण्यावर आजीबाईंचा धम्माल डान्स VIDEO; उत्साह पाहून व्हाल थक्क

दीपिकाच्या गाण्यावर आजीबाईंचा धम्माल डान्स VIDEO; उत्साह पाहून व्हाल थक्क

एखाद्या माणसाच्या मनात कुठली गोष्ट करण्याची इच्छा असेल तर वयही त्याला रोखू शकत नाही. हे वाक्य खरं करून दाखवलंय 63 वर्षाच्या रवि बाला शर्मा (Ravi Bala Sharma) यांनी.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 जुलै: सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सामान्य व्यक्तीही रातोरात स्टार (Star) बनल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात आपल्या टॅलेंटच्या जोरावर काही लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. यात बाबा जॅक्सन आणि रानू मंडल (Ranu Mondal) यासारखी अनेक नावं आहेत. आता एका आजीबाईचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

मुलीवर शार्कनं हल्ला करताच वडील बनले ढाल; समुद्रात उडी घेतली अन्...

असं म्हटलं जातं, की एखाद्या माणसाच्या मनात कुठली गोष्ट करण्याची इच्छा असेल तर वयही त्याला रोखू शकत नाही. हे वाक्य खरं करून दाखवलंय 63 वर्षाच्या रवि बाला शर्मा (Ravi Bala Sharma) यांनी. त्यांचा डान्स (Dance Video) पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्या अनेकदा बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर (Famous Bollywood Songs) डान्स करून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच त्यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्या अत्यंत सुंदर पद्धतीनं बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) सिनेमातील मोहे रंग दो लाल या गाण्यावर डान्स करत आहेत.

Yuck! प्रेग्नन्सी सरप्राइझच्या नादात तिने नवऱ्याला चाखायला लावली आपली लघवी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 63 वर्षाच्या आजीबाई लेहंगा आणि चोळी घालून मोहे रंग दो लाल गाण्यावर क्लासिकल डान्स करत आहेत. यासोबतच त्यांचे हावभावही मन जिंकणारे आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. एका यूजरनं यावर प्रतिक्रिया देत म्हटलं, प्रेमळ हावभाव आणि खूप सुंदर डान्स. आणखी एका यूजरनं लिहिलं, की जितरा छान तुमचा डान्स आहे तितक्याच सुंदर तुम्हीदेखील आहात. याशिवाय इतरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ ravi.bala.sharma नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First published:

Tags: Dance video, Deepika padukone, Social media viral, Viral video.