Home /News /lifestyle /

Yuck! असं कोण करतं? प्रेग्नन्सी सरप्राइझच्या नादात तिने नवऱ्याला चाखायला लावली आपली लघवी

Yuck! असं कोण करतं? प्रेग्नन्सी सरप्राइझच्या नादात तिने नवऱ्याला चाखायला लावली आपली लघवी

महिलेच्या प्रेग्नन्सी सरप्राइझने सर्वांनाच शॉक दिला आहे.

    मुंबई, 12 जुलै : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक अनमोल क्षण असतो आणि ही गूड न्यूज (Pregnancy Good News) तिला सर्वात आधी आपल्या नवऱ्यालाच (Husband) देण्याची इच्छा असते. आपण आई-वडील होणार आहोत हे आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रत्येक महिलांचा अंदाज वेगवेगळा असतो. बहुतेक महिलांना ही बातमी थेट सांगायची नसती तर एखाद्या कोड्यात किंवा सरप्राइझ (Surprise) देत सांगायचं असतं. यासाठी त्या हटके मार्ग शोधतात. सध्या अशाच एका प्रेग्नन्सी सरप्राइझचा (Shocking Pregnancy Surprise)  व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे, जो पाहून सर्वांनाच शॉक बसला आहे. 'सर्कास्म' (Sarcasm) या फेसबुक पेजवर प्रेग्नन्सी सरप्राइझचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात महिलेला आपण प्रेग्नंट असल्याचं समजताच ती खूप आनंदी होते. आपला हा आनंद तिला तिच्या नवऱ्यासोबत शेअर करायचा आहे. पण नवऱ्याला प्रेग्नन्सी सरप्राइझ देण्यासाठी तिने विचित्र मार्ग निवडला. व्हिडीओत पाहू शकता, महिलेच्या हातात एक प्रेग्नन्सी किट आहे. ही कीट ती पॉप्सिकलमध्ये टाकते म्हणजे आईस्क्रिम स्टिक म्हणून ती या प्रेग्नन्सी किटचा वापर करते. ती आइस्क्रिम तयार करते आणि ते आपल्या नवऱ्याला खायला देते. तिचा नवरा तिला आईस्क्रिम खाण्याबाबत विचारतो पण ती त्याला नकार देते. नवरा खाता खाता आइस्क्रिमकडे पाहत असतो. त्याला आइसस्क्रिम स्टिकच्या जागी काही तरी वेगळं असल्याचा संशय येतो. तो भराभर आइस्क्रिम संपवतो आणि पाहतो तर काय आइस्क्रिम स्टिकच्या जागी प्रेग्नन्सी किट. हे वाचा - ब्रेकअप के बाद गर्लफ्रेंडचा 'कार'नामा; धोखेबाज बॉयफ्रेंडचा घेतला सॉलिड बदला तेव्हा ही महिला आपल्या नवऱ्याला आपण प्रेग्नंट असल्याचं सांगते. त्यानंतर तिचा नवरा तिला बोलतो हे खूप विचित्र आहे. तसंच तू यावर सू केलीस का? असंही तो तिला विचारतो तेव्हा ती हो म्हणते. तिच्या नवऱ्यालाही थोडा धक्का बसतोच पण आपण बाबा होणार असल्याचा आनंद त्याला होतो. त्यामुळे तो तिला मिठीच मारतो. तिचा नवऱ्याला मिळालेल्या गूड न्यूजमुळे त्याने नकळत आपल्या बायकोची लघवी चाखली याचं फार त्याने मनावर घेतलं नाही पण हा व्हिडीओ पाहणाऱ्याला मात्र महिलेच्या सरप्राइझ देण्याच्या पद्धतीने शॉक बसला आहे. हे वाचा - जगातला सर्वात महागडा कंडोम; किंमत वाचूनच येईल चक्कर हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. प्रेग्नन्सी सरप्राइझ देण्याची ही अशी कोणती विचित्र पद्धत आहे, असाच प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Pregnancy, Relationship

    पुढील बातम्या