Home /News /viral /

निखळ हास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली ही महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

निखळ हास्यामुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आली ही महिला; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

एक विवाहित महिला (Viral Video of Married Woman) आपल्या घरामध्ये कपडे धुण्याचं काम करत आहे. इतक्यात घरातील कोणीतरी सदस्य तिथे येतो आणि महिलेचा व्हिडिओ बनवू लागतो

  नवी दिल्ली 22 जून: सोशल मीडियावर अनेकदा नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. या व्हिडिओला नेटकऱ्यांची तुफान पसंतीदेखील मिळते. अनेकदा हे व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे असतात. तर, कधी हे व्हिडिओ (Trending Video) पाहून आपला संपूर्ण दिवसच चांगला जातो. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक असे लोक असतात ज्यांचं हसूच इतकं प्रेमळ असतं की आपल्याही प्रसन्न करून जातं. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही असाच आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडिओ आणि त्यातील व्यक्ती आपल्या कायमचे लक्षात राहातात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही आपोआप हसू उमटेल. चेहऱ्यावर स्मित हास्य तुमच्या सौंदर्यात किती भर टाकतं, याचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ आहे. इंजेक्शनच्या भीतीने पळत सुटले आजोबा; मग नर्सने काय केलं ते तुम्हीच पाहा VIDEO व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक विवाहित महिला (Viral Video of Married Woman) आपल्या घरामध्ये कपडे धुण्याचं काम करत आहे. इतक्यात घरातील कोणीतरी सदस्य तिथे येतो आणि महिलेचा व्हिडिओ बनवू लागतो. हे पाहून ही महिला लाजते आणि एक क्यूट स्माईल देते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  हनिमूनच्या रात्री पतीने पत्नीला सांगितलं, 'मला स्त्री व्हायचंय!'; त्यानंतर... हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं आहे, की या महिलेचं हास्य खरंच फार सुंदर आहे. तर, आणखी एका यूजरनं लिहिलं आहे, की यांचं हास्य पाहून तर दगडालाही पाझर फुटेल. इतर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जाट के जोक्स नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. ही बातमी देईपर्यंत व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video viral, Viral video on social media

  पुढील बातम्या