नवी दिल्ली 01 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा हे व्हिडिओ अतिशय मनोरंजन असतात तर अनेकदा हैराण करणारे. काही व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांची मनं जिंकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून चक्रावून जाल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की लग्नानंतर नवी नवरी (Bride) जेव्हा सासरी येते तेव्हा ती अतिशय लाजरी असते. इतकंच नाही तर सुरुवातीचे काही दिवस ती सासरी फार बोलणंही टाळते. मात्र, काही नवऱ्या अगदी उलट असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक नवी नवरी आपल्या नणंदेसोबत डान्स (Dance Video of Bride) करताना दिसते.
Postmortem रूममध्ये कसं चालतं काम? महिला कर्मचाऱ्यानं सांगितला भीतीदायक अनुभव व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवी नवरी आपल्या नणंदेसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हरियाणवी गाणं ‘52 गज का दामन…’ वरील नवरीचा जान्स सर्वच पाहतच राहिले. नवरीच्या या खास डान्सनं सर्वांचंच मन जिंकलं. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याला लोकांची पसंतीही मिळत आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं की नवरीचा डान्स खरंच कौतुकास्पद आहे. anshuydv8 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.