नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : सध्या देशभरात लग्नाचा सीझनच (Wedding Season) सुरू आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावरही लग्नातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू आवरत नाही तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या अशाच एक नवरीबाईचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात नवरी अगदी हटके अंदाजात डान्स (Bride Dance Video) करताना दिसते. हा डान्स पाहून सगळेच तिचे फॅन झाले आहेत. इतकंच नाही तर डान्स करताना व्हिडिओमध्ये तिने दिलेले हावभावही पाहण्यासारखे आहेत. हा डान्स व्हिडिओ पाहून तुम्हीही आपोआपच थिरकायला लागाल. चिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरुणाने स्वतःला आगीत झोकलं; अंगावर काटा आणणारा VIDEO लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे लग्नातील फोटोशूटपासून नवरीबाईची एन्ट्री आणि डान्सपर्यंत सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि या गोष्टींकडे आजकाल जरा जास्तच लक्ष दिलं जातं. याचाच पुरावा देणारा हा व्हिडिओ आहे. यात नवरीबाई अगदी बिनदास्त डान्स करताना दिसते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरीने एक हेवी लेहंगा घातला आहे आणि ती वरात्यांसोबत अगदी हटके अंदाजात डान्स करताना दिसते.
नवरीबाईच्या डान्स स्टेप आणि तिचा अंदाज पाहून तुम्हालाही समजेल की ती आपला डान्स अतिशय एन्जॉय करत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नवरीचं विशेष कौतुक वाटेलय व्हिडिओमध्ये नवरीने ज्याप्रमाणे ढोलाच्या तालावर स्टेप्स दाखवल्या तो अतिशय क्य़ूट आहेत. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. आतापर्यंत सोशल मीडियावर 2.5 मिलयनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 1 लाख 68 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अरे देवा! हे पाहण्याआधी आम्ही…; Maggi PaniPuri video पाहून भडकले नेटिझन्स यूजर्सने या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ अतिशय खास आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, सो ब्यूटिफूल. याशिवायही हा व्हिडिओ इतरही अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी याचं संपूर्ण व्हर्जन अपलोड करण्याची मागणी केली आहे. एकंदरीतच नवरीबाईचा हा व्हिडिओ लोकांची मनं जिंकत आहे.