Home /News /videsh /

चिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरुणाने स्वतःला आगीत झोकून दिलं आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

चिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरुणाने स्वतःला आगीत झोकून दिलं आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

लहान मुलांना वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या जीवाची लावली बाजी.

    वॉशिंग्टन, 24 फेब्रुवारी :  स्वतःच्या जीवासाठी धडपड प्रत्येक जण करतो पण दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारे लोक फारच कमी. इतरांचा जीव वाचवण्यासाठी काही लोक स्वतःच्या जीवाचीही बाजी लावतात. स्वतःला मरणाच्या दारात झोकून देतात. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाने लहान मुलांना आगीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी स्वतःला या आगीत झोकून दिलं आहे (Man saved child from fire). अमेरिकेच्या एरिजोनातील ही घटना. 18 फेब्रुवारीला गिल्बर्ट रोड आणि सदर्न एव्हेन्यूजवळील मेसा अपार्टमेंटमध्ये आग लागली. या बिल्डिंगला आग लागल्याची माहिती मिळतात पोलीस आणि अग्निसमन दलाचे अधिकारी तिथं दाखल झाले. या पेटत्या इमारतीत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी एका तरुणाने पोलिसांची मदत केली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तेव्हा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन अपार्टमेंट्सना आगीने विळखा घातला होता. या अपार्टमेंटच्या मागील खोलीत एक 2 वर्षांचा आणि एक 6 वर्षांचा मुलगा अडकला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. हे वाचा - ...अन् लेकासाठी माजी पोलीस बनला अट्टल चोर; तुरुंगवास झाला तरी करत राहिला गुन्हा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक व्यक्ती मदतीसाठी धावून आला. बिल्डिंगमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या या इमारतीत स्वतःला झोकून दिलं. आग लागलेल्या या इमारतीत तो घुसला. पुढे जे घडलं ते पाहूनच अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता धगधगत्या इमारतीतील एका खिडकीची काच तो फोडतो आणि तिथून अपार्टमेंटमध्ये प्रवेश करतो. तिथून तो एका लहान मुलाला बाहेर काढतो आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतो. त्यानंतर आणखी एका मुलालाही तो अशाच पद्धतीने इमारतीतून सुरक्षितरित्या बाहेर काढताना दिसतो. मेसा पोलिसांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - जीममध्ये एक्सरसाइझ करताना महिलेचा गेला जीव; CCTV कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू झी न्यूज हिंदीने एरिजोना रिपब्लिकचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मेसा पोलिसांनी दिली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fire, Viral, Viral videos

    पुढील बातम्या