मुंबई, 24 फेब्रुवारी : मॅगी आणि पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण सध्या या दोन्ही पदार्थांचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून नेटिझन्स भडकले आहेत. मॅगी आणि पाणीपुरीच्या (Maggi PaniPuri) लूक आणि टेस्टमध्ये काही वेगळेपण देण्यासाठी विक्रेत्याने असं एक्सपरिमेंट्स केलं आहे, जे लोकांना बिलकुल आवडलं नाही आहे (Weird food combinations). मॅगी आणि पाणीपुरी हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ. एखाद्या व्यक्तीला हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे कितीही आवडत असले तरी एकत्र नक्कीच आवडणार नाही. हेच नेमकं या विक्रेत्याने केलं आहे. एरवी आपण मॅगी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. पाणीपुरीतही स्टफिंगमध्ये बटाटा, मूग, वाटाणे टाकले जातात. पण तुम्ही कधी मॅगी आणि पाणीपुरी एकत्र करून म्हणजे मॅगीवाली पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? फक्त वाचूनच तुम्हाला उलटी आली असेल. पण अशी मॅगीवाली पाणीपुरी प्रत्यक्षात बनवली जाते आहे आणि विकली जाते आहे. ज्याचा हा व्हिडीओ आहे. हे वाचा - सोशल मीडियावरील उपाय पडला महागात! 21 लाख रुपये खर्चून तरुणाने शरीराची लावली वाट व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती हातात पाणीपुरीची पुरी घेते. ती पाणीपुरीप्रमाणे फोडते. यात पाणीपुरीचं स्टफिंग भरणं अपेक्षित आहे. पण ही व्यक्ती या पुरीच चक्क शिजवलेली मॅगी भरते. त्यानंतर त्यावर पाणीपुरीचं तिखट पाणी टाकते.
@Iyervval नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही त्रस्त, विचलित व्हाल. त्यामुळे तुमच्या रिस्कवर हा व्हिड़ीओ पाहावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हे वाचा - तुम्हालाही आहेत आरोग्याच्या ‘या’ समस्या? मग चुकुनही खाऊ नका पपई हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काही मोजक्याच लोकांना हे फूड कॉम्बिनेशन आवडलं आहे. तर बहुतेक युझर्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. हे काय आणि का केलं जातं आहे? हे देवा, हे पाहण्याआधी आम्हाला मरण का आलं नाही, यासाठी शिक्षा का आहे, याला बॅन करा, अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला ही मॅगीवाली पाणीपुरी पाहून काय वाटतं. ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट देऊन नक्की सांगा.