Home /News /viral /

Shocking Video : ऑडीचा हाहाकार, दुचाकींना उडवित झोपडपट्टीमध्ये शिरली भरधाव कार

Shocking Video : ऑडीचा हाहाकार, दुचाकींना उडवित झोपडपट्टीमध्ये शिरली भरधाव कार

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 9 जणं गंभीर जखमी आहेत.

    राजस्थान, 11 नोव्हेंबर : जोधपुरमधील (Jodhapur News) एम्स रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कारचा कहर पाहायला मिळाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडीने एम्स रोडवरील झोपडपट्टीमधील लोकांना चिरडलं. या अपघातात (Road Accident) एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर या अपघातात 9 जणं गंभीर जखमी झाले आहेत. (Shocking accident Video : Audi car plows into slums blowing up two wheeler) जखमींना एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. येथे दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांनी ऑडी कारच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साधारण 11 वाजता एक ऑडी कार भरधाव वेगाने येत होती. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीत शिरली. हे ही वाचा-24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच यादरम्यान झोपडपट्टीतील लोकांच्या अंगावर गाडी गेली. या अपघातात एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याशिवाय या अपघातात 9 जणं जखमी झाले आहेत. त्यांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय जोधपूर दौऱ्यावर पोहोचलेले सीएम अशोक गहलोत यांना अपघाताची माहिती मिळताच ते जखमींना पाहण्यासाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. येथे त्यांनी जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली. सोबतच पोलीस अधिकाऱ्यांकडून या अपघाताची माहिती घेतली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ऑडी कार समोरील दुचाकींना उडवत चालली होती. शेवटी कार रस्त्याशेजारी असलेल्या झोपडपट्टीत शिरली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajasthan, Road accident, Shocking video viral

    पुढील बातम्या