पूरग्रस्ताला केली मदत चेन्नईतील इन्स्पेक्टर राजेश्वरी यांना किलपुल स्मशानभूमीतून एक फोन आला. तिथे एक माणूस बेशुद्ध पडल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर राजेश्वरी या सहकाऱ्यांसोबत तिथं पोहोचल्या. त्या ठिकाणी उदयकुमार नावाची व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडली होती. ही व्यक्ती मुळातच अशक्त असल्यामुळे तिला उठता येत नव्हतं. पुराचं पाणी नाकातोंडात गेल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. मात्र त्या व्यक्तीचा श्वास सुरु असल्याचं समजताच बिलकूल वेळ न दवडता त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचं राजेश्वरी यांच्या लक्षात आलं. खांद्यावर उचलून ठेवलं रिक्षात खांद्यावर उचलून त्यांनी उदयकुमार यांना एका रिक्षात ठेवलं आणि उपचारांसाठी तातडीनं हॉस्पिटलला पाठवन दिलं अनवाणी पायानं एकाचा जीव वाचवण्यासाठी राजेश्वरी यांनी दाखवलेल्या जिगरबाजपणाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. हे वाचा- 'बीफ खाण्यास चुकीचं मानत नव्हते सावरकर, गायीला माता मानण्याच्याही होते विरोधात' व्हिडिओ होतोय व्हायरल राजेश्वरी यांनी दाखवलेल्या धैर्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक नेटिझन्सकडून राजेश्वरी यांचं कौतुक करत त्यांना सलाम केला जात आहे. आजकाल ज्यांच्या कामाचं कौतुक करावं, असे फारच कमी लोक पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.Inspector E. Rajeshwari of the Chennai Police just being the badass she always has been. Seen here rescuing a man found unconscious in the flooded city. Salute! pic.twitter.com/3tfte9AdTR
— Shiv Aroor (@ShivAroor) November 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Police, Video viral