मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! इवल्याशा चिमुकल्याचा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

बापरे! इवल्याशा चिमुकल्याचा जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

अनेकदा लोक असे स्टंट करतात जे पाहून अंगावर काटा येतो. सध्या तरुणाईमध्ये स्टंटचं प्रमाण वाढलं आहे. इतकंच नाही तर आता या लिस्टमध्ये लहान मुलांचाही समावेश होत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) प्रत्येकाला प्रसिद्धी मिळवायची असते. काही लोक विचित्र कृत्य करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात तर काही चर्चेत येण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. लाईक आणि कमेंट (Like and Comment) मिळवण्यासाठी हे लोक काहीही करतात. विशेषतः एखादा स्टंट व्हिडिओ (Stunt Video) पाहताना तर तुम्हाला हे नक्कीच जाणवेल. मात्र, यातील काही लोक जबरदस्त स्टंट करून लोकांची मनंही जिंकतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल (Stunt Video of Little Boy) होत आहे. यात तो छोट्याशा बाईकवर जबरदस्त स्टंस करताना दिसतो.

पायऱ्यांवरून पडू लागलं बाळ; झेप घेत मांजरानं वाचला चिमुकल्याचा जीव, VIDEO VIRAL

अनेकदा लोक असे स्टंट करतात जे पाहून अंगावर काटा येतो. सध्या तरुणाईमध्ये स्टंटचं प्रमाण वाढलं आहे. इतकंच नाही तर आता या लिस्टमध्ये लहान मुलांचाही समावेश होत आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा छोट्याशा बाईकवर जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदाचाच आहे, मात्र यात ज्या पद्धतीनं लहान मुलगा स्टंट करताना दिसत आहे, ते पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा कॉलनीतील रस्त्यावर चार चाकाची छोटी बाईक चालवत आहे. हैराण करणारी बाब म्हणजे हा मुलगा दोन चाकावरही ही बाईक चालवत आहे. हा मुलगा ज्या अंदाजात बाईक चालवत आहे, ते पाहून भलेभले स्टंट मॅन आणि बायकर्सही थक्क होतील. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमहीही नक्कीच विचारात पडला असाल की इतक्या लहान वयात हा मुलगा हे स्टंट कसे करत आहे.

फक्त प्रौढच घेऊ शकतात या खास आईस्क्रीमचा आस्वाद; अजब आहे यामागचं कारण

अवघ्या 10 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर @JukinMedia नावाच्या हँडलवरुन शेअर केला गेला आहे. यूजरनं याला कॅप्शन देत लिहिलं, विकेण्डला बाईक राईडची मजा घेताना.

First published:

Tags: Stunt video, Video Viral On Social Media