जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पायऱ्यांवरून पडू लागलं बाळ; झेप घेत मांजरानं वाचला चिमुकल्याचा जीव, VIDEO VIRAL

पायऱ्यांवरून पडू लागलं बाळ; झेप घेत मांजरानं वाचला चिमुकल्याचा जीव, VIDEO VIRAL

पायऱ्यांवरून पडू लागलं बाळ; झेप घेत मांजरानं वाचला चिमुकल्याचा जीव, VIDEO VIRAL

व्हायरल होणारा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला नक्कीच मांजर आवडू लागेल. कारण एका मांजरीनं सतर्कता दाखवत एका लहान बाळाचा जीव वाचवला आहे (Cat Saves Baby From Falling Down).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : तुम्हाला मांजर (Cat) आवडते का? जर आवडत नसेल तर सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला नक्कीच मांजर आवडू लागेल. कारण एका मांजरीनं सतर्कता दाखवत एका लहान बाळाचा जीव वाचवला आहे (Cat Saves Baby From Falling Down). याचंच एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल (CCTV Footage Viral on Social Media) झालं आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण मांजराचं कौतुक करत आहे. हा व्हिडिओ जुना आहे मात्र ट्विटरवर (Twitter Video) पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. फक्त प्रौढच घेऊ शकतात या खास आईस्क्रीमचा आस्वाद; अजब आहे यामागचं कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक लहान बाळ रांगत चाललेलं आहे. तर एक मांजर तिथेच बसलेली दिसत आहे. यानंतर काहीच वेळात लहान बाळ पायऱ्यांच्या दिशेनं जाऊ लागतं. मांजर मात्र तिथेच बसलेली असते. बाळ जेव्हा पायऱ्यांजवळ पोहोचतं तेव्हा मांजर त्याला वाचवण्यासाठी लगेचच उडी घेते आणि बाळाला धक्का देत त्याला तिथून बाजूला करते. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की जर ही मांजर योग्य वेळी तिथे पोहोचली नसती तर हे बाळ पायऱ्यांवरुन खाली कोसळलं असतं.

जाहिरात

18 सेकंदाचा हा व्हिडिओ @aflyguynew1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. 23 सप्टेंबरला ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 90 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. जवळपास 5 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. VIDEO: मुलीला धक्का देत खाली पाडलं अन्…; माकडाचं कृत्य पाहून व्हाल हैराण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेकांनी मांजरीचं कौतुक केलं आहे. काहींनी लिहिलं, की ही मांजर खरंच खूप चांगली आहे. तर काहींनी म्हटलं, की मला मांजर फार आवडत नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आवडू लागल्या. इतरही अनेकजण यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात