मुंबई, 29 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social media) तरुण-तरुणी जितके अॅक्टिव्ह आहेत, तितकेच आजी-आजोबाही (Grandmother and grandfather video). सोशल मीडियाच्या जगातही वयस्कर मंडळी मागे नाहीत (Dada dadi video). आपलं टॅलेंट ते दाखवताना दिसतात. कुणी उत्तम अभिनय करतं तर कुणी डान्स. सोशल मीडियावर अशा वृद्ध मंडळींचं कौशल्य पाहून तरुणही थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Talented dadi video). एका आजीने आपल्यातील अनोखं टॅलेंट दाखवलं आहे. हे टॅलेंट पाहून सोशल मीडिया युझर्स हैराण झाले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आजीबाईचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. आजीने सर्वांना फेल केलं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. असं या आजीने नेमकं काय केलं आहे ते पाहा.
व्हिडीओत पाहू शकता देशी लूकमध्ये एक आजी बसलेली आहे. तिचे हात गुलाबी रंगाने रंगवण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक गाणं सुरू होतं. हे वाचा - VIDEO - विमानात ‘पायलट बाबू’चा बिहारी अंदाज; भोजपुरीत स्वागत करताच प्रवाशांनी… गाणं लागताच आजी त्या गाण्यावर आपल्या हातांची, बोटांची हालचाल करताना दिसते. गाण्याच्या बोलानुसार ती बोटं हलवते. हातांमधूनच ती गाण्याचे बोल समजवण्याचा प्रयत्न करते. ‘हां जी बिलकुल प्यार करेंगे, सीधा दिल पे वार करेंगे’ असे या गाण्याचे बोल आहेत. @anujtutter00 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आजीचा हा व्हिडीओ सर्वांना आवडला आहे. आजीच्या टॅलेंटला सर्वांनी दाद दिली आहे.