• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर

मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर

मुलींना बापाला रंगेहाथ पकडलं.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 29 ऑक्टोबर : भिलवाडा (Bhilwada News) जिल्ह्यातील जहाजपूर उपविभाग परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा (High voltage drama) पाहायला मिळाला. उपविभागातील हनुमान नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसोबत जात असताना दोन तरुणींनी वडिलांना रंगेहाथ पकडलं. रागाच्या भरात दोन्ही मुलींनी वडिलांच्या कथित महिला मैत्रिणीला मारहाण केली. यावेळी कुच्छवाडा रोडवर वाहतूक कोंडीची (Traffic jam) परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी घटनास्थळ सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, कुचवाडा रोडवर धावणाऱ्या दोन मुली अचानक एका कारसमोर उभ्या राहिल्या. यादरम्यान कार पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी ती गाडी पुढे जाण्यापासून रोखली. हे ही वाचा-कमाल! Petrol शिवायच चालवली Bike; पठ्ठ्याने काय केला Jugaad पाहा Video मुलींनी दावा केला की त्यांचे वडील कारमध्ये होते आणि त्यांच्यासोबत एक महिला होती जी त्यांची मैत्रीण आहे. महिला आणि तिच्या वडिलांचे अनेक महिन्यांपासून अफेअर सुरू होते. त्यामुळे त्यांच्या घरात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान मुलींनी वडिलांना गाडीतून बाहेर काढले आणि खूप काही सांगितले. त्याचवेळी महिलेलाही बाहेर काढून बेदम मारहाण केली. यावेळी लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आरोपी महिलेने संधी मिळताच तेथून पळ काढला.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: