Home /News /viral /

किक मारून भिंत तोडली पण..., दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO

किक मारून भिंत तोडली पण..., दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO

हिरोगिरी पडली महागात.

हिरोगिरी पडली महागात.

आपली ताकद आजमावण्याच्या नादात तरुणाने स्वतःवर संकट ओढावून घेतलं.

    मुंबई, 26 ऑगस्ट : आपली बॉडी हिरोसारखी असावी, हिरोसारखी फायटिंग करावी असं बहुतेक तरुणांना वाटतं. त्यामुळे तशीच बॉडी बनवून हिरोसारखा कारनामासुद्धा किती तरी तरुण करतात. असाच एक तरुण हिरोगिरी करायला गेला. पण ते त्याला चांगलंच महागात पडलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका तरुणाने किक मारून चक्क भिंत तोडण्याचा प्रयत्न केला (Boy kicking on the wall). त्याचा हा प्रयत्न यशस्वीही झाला, म्हणजे त्याने किक मारत भिंत तोडली पण दुसऱ्याच क्षणी त्याला चांगलाच फटका बसला (Wall fell on Boy's leg). नेमकं या तरुणासोबत काय झालं पाहा. व्हिडीओत पाहू शकता तरुण आपली लाथ उडवत समोरच्या भिंतीवर मारतो. एका किकने भिंत काही तुटत नाही. मग तो पुन्हा पुन्हा किक मारत राहतो. अखेर भिंतीच्या मधील भाग कोसळतो आणि दुसऱ्याच क्षणी भिंतीच्या वरील भाग खाली येतो आणि तो तरुणाच्या पायावरच पडतो. तरुणाचा पाय या भिंतीत अडकतो. तो वेदनेने ओरडू लागतो.  आपली ताकद दाखवण्याच्या नादात तरुण पुरता फसला. त्याचा मूर्खपणा त्याला भारी पडला. हे वाचा - सोशल मीडियावरील 'हे' चॅलेंज तुम्हीही स्वीकारताय? मग गंभीर परिणाम वाचाच @AwardsDarwin ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी या तरुणाच्या मूर्खपणावर हसतं आहे, तर कुणाला त्याची दयाही आली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या