• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'त्या' ग्रहावर खरंच एलियन्स आहेत? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

'त्या' ग्रहावर खरंच एलियन्स आहेत? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

 हा ग्रह उष्ण असून, त्यावर पाणीही (Water) असण्याची शक्यता आहे. या नव्या ग्रहावर अनेक खोल महासागरही आहेत.

हा ग्रह उष्ण असून, त्यावर पाणीही (Water) असण्याची शक्यता आहे. या नव्या ग्रहावर अनेक खोल महासागरही आहेत.

हा ग्रह उष्ण असून, त्यावर पाणीही (Water) असण्याची शक्यता आहे. या नव्या ग्रहावर अनेक खोल महासागरही आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : जगभरातले शास्त्रज्ञ आणि खगोलतज्ज्ञ गेल्या कित्येक वर्षांपासून एलियन्स (Aliens) अर्थात परग्रहावरच्या जीवांचा शोध घेत आहेत. अनेक सिनेमांमधून किंवा कथा-कादंबऱ्यांमधून एलियन्स भेटीला आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र एलियन्सच्या अस्तित्वाला शास्त्रीय पुष्टी देणारं काहीही सापडलेलं नाही. काही पुरावे मिळतात, व्हायरल होतात; मात्र त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे शास्त्रीय पातळीवर ते नाकारले जातात. असं असलं तरी एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत असं सांगणारा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतल्या (Cambridge University) शास्त्रज्ञांनी मात्र अलीकडेच असा दावा केला आहे, की त्यांनी एलियन्सचं वास्तव्य असलेल्या ग्रहाचा शोध लावला आहे. केम्ब्रिज विद्यापीठातल्या डॉ. निक्कू मधुसूदन (Dr Nikku Madhusudan) यांच्या नेतृत्वाखालच्या शास्त्रज्ञांच्या टीमने असा एक ग्रह शोधला आहे की, ज्यावर जीवनाचे संकेत देणारे कण (Molecules) सापडले आहेत. ह्यसन प्लॅनेट (Hycean planet) असं त्या ग्रहाचं नाव ठेवण्यात आलं आहे. हा ग्रह उष्ण असून, त्यावर पाणीही (Water) असण्याची शक्यता आहे. या नव्या ग्रहावर अनेक खोल महासागरही आहेत. आता शास्त्रज्ञांची ही टीम त्यात बायोसिग्नेचरचा (Biosignature) शोध घेत आहे. त्यातून त्या ग्रहावरच्या जीवसृष्टीचे संकेत मिळतील. शास्त्रज्ञांच्या टीमच्या म्हणण्यानुसार, त्या ग्रहावरचं वातावरणही पृथ्वीसारखंच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी खरी ठरणार? 'या' जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक खगोलशास्त्रज्ञांना असं वाटतं की, या नव्या ग्रहाच्या शोधामुळे जगात क्रांती घडून येऊ शकेल. सौरमालेत असे अनेक ग्रह (Planets) आहेत, जिथे जीवन असू शकतं. अशा सगळ्या ग्रहांचा शोध घेतला जात आहे; मात्र ह्यसन ग्रहावर जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेवर शास्त्रज्ञांच्या या टीमने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. या टीमने म्हटलं आहे, की आता फक्त दोनच वर्षांचा प्रश्न आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या नागरिकांना केवळ दोन वर्षांत एलियन्सच्या अस्तित्वाचा केवळ पुरावाच नाही, तर सगळी सविस्तर माहितीच मिळेल. हा ग्रह पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्षं दूर आहे. त्याला खगोलशास्त्रीय भाषेत  K2-18b असं नाव देण्यात आलं आहे. मोठी बातमी! Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून चौघांचा मृत्यू सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचायला जवळपास आठ मिनिटं लागतात. एक प्रकाशवर्ष (Light Year) म्हणजे पृथ्वीवरच्या एका वर्षात प्रकाश कापत असलेलं अंतर. हे परिमाण अंतराळातल्या ग्रहांमधलं अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं. एक प्रकाशवर्ष म्हणजे, जवळपास 6 ट्रिलियन मैल (6 Trillion Miles) किंवा सुमारे 9 ट्रिलियन किलोमीटर्स होय.
  Published by:sachin Salve
  First published: