• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • काय म्हणावं या नवरीबाईला! स्वतःच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून चढला पारा; कॉम्प्लिमेंट देणाऱ्याचीच काढली खरडपट्टी

काय म्हणावं या नवरीबाईला! स्वतःच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून चढला पारा; कॉम्प्लिमेंट देणाऱ्याचीच काढली खरडपट्टी

आपल्याबाबत कमेंट ऐकून नवरीच्या रागाचा पारा चढला.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑक्टोबर : कुणीतरी आपलं कौतुक करावं, स्तुती करावी, आपल्याबाबत चांगलं बोलावं असं प्रत्येकाला वाटतं. कोणत्याही महिलेला तर तिच्या सौंदर्याचं कौतुक केलेलं आवडतंच. असं असताना एका अशा नवरीचा व्हिडीओ (Bride video) व्हायरल होतो आहे, जी आपल्या सौंदर्याचं कौतुक ऐकून भडकली आहे (Angry bride video). तिच्या सौंदर्याचं कौतुक केल्यानंतर आभार मानणं दूर उलट तिने कौतुक करणाऱ्याची लग्नातच खरडपट्टी काढली आहे (Bride angry on wedding). कोणतीही तरुणी आपल्या लग्नात (Wedding Video) खूपच सुंदर दिसते. आपण सुंदर दिसावं, आपल्या नवरदेवाची नजर आपल्यावरून हटू नये, पाहुणे-नातेवाईक-मित्रमैत्रिणी यांनीसुद्धा आपल्या सुंदरतेबाबत चर्चा करावी असं नवरीला वाटतं. असंच कौतुक या नवरीचंही करण्यात आलं, पण तिला ते आवडलं नाही. आपल्या सौंदर्याची तारीफ ऐकून तिच्या रागाचा पारा चढला. असं नेमकं झालं तरी काय?
  व्हिडीओत पाहू शकता, नवरी लग्नासाठी तयार होते आहे. ती खूपच सुंदर दिसते आहेत. तिच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. तिचं सौंदर्य पाहून त्यांना स्वतःला आवर घालता आला नाही. त्यांनी नवरीजवळ जात तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. पण आपल्या सौंदर्याचं कौतुक ऐकून नवरीबाई लाजली नाही, तिला आनंद झाला नाही तर ती भडकली. कौतुक करणाऱ्याचे आभार मानणं दूर तिने उलट त्याची खरडपट्टीच काढली. हे वाचा - VIDEO - नवरीला पाहताच नवरदेवाच्या मित्रांचा तोल ढासळला; धावत येत सर्वांसमोरच... खरंतर नवरीबाईच्या रागाचं कारणही तसंच होतं. तिच्या सौंदर्याबाबत इतकी विचित्र कमेंट करण्यात आली. ती तिला सहन झाली नाही आणि म्हणून तिने आपल्या सौंदर्याची स्तुती करणाऱ्याला सुनावलं. व्हिडीओतील नवरीचं बोलणं ऐकलं तर समजेल की नवरीला कुणीतरी पारो म्हटलं आहे. म्हणजे तिला पाहून तू पारोसारखी दिसते असं म्हटलं. आपल्याबाबत अशी कॉम्पिलमेंट नवरीला सहन झाली नाही. कमेंट ऐकताच ती भडकली आणि म्हणाली, कोणासरखी दिसते, पारो दिसते आहे. तुम्ही लोक मला पारो पारो म्हणणार तर मला कसं वाटेल. हे वाचा - VIDEO: दबंग नवरीबाईनं स्टेजवरच नवरदेवाला केलं गारद; वरानं हात जोडून मागितली माफी आय डोंट से चीज इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
  Published by:Priya Lad
  First published: