मुंबई, 16 ऑक्टोबर : मांजर आणि उंदराची (Cat rat fight) लढाई तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही एकमेकांचे शत्रू ओळखले जातात (Animal fight video) आणि या दोघांच्या लढाईत तसं पाहायला गेलं तर मांजरच बाजी मारतं. पण सध्या सोशल मीडियावर मांजर आणि एका कोंबडीच्या फायटिंगचा (Cat cock fight video) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात मांजर-कोंबडीची जबरदस्त फायटिंग पाहायला मिळते आहे. आता या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली याची उत्सुकता तुम्हाला असेलच. बऱ्याच प्राण्यांचे फायटिंगचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता एक प्राणी आणि एका पक्ष्याच्या फायटिंगचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. मांजर आणि कोंबडीच्या फायटिंगचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. यात दोघंही एकमेकांना सॉलिड टक्कर देताना दिसतात.
Not today 🐈 pic.twitter.com/IUswdR8aHq
— Funny Tweets (@SeeFunnyVideo) April 4, 2021
आता या फायटिंगमध्ये कोण जिंकणार असं विचारलं तर साहजिक आपण मांजर म्हणून पण इथं मात्र कोंबडीने बाजी मारली आहे. कायम उंदराला हरवणाऱ्या मांजरीला कोंबडीने हरवलं आहे. हे वाचा - अस्वलाची छाती पाहूनच घाबरला वाघ, लढण्याआधीच पत्करली शरणागती; VIDEO VIRAL हा व्हिडीओ एका फार्मचा वाटतो आहे. तिथं बऱ्याच कोंबड्या आहेत. सुरुवातील एक मांजर आणि एक कोंबडी आमनेसामने उभ्या असलेल्या दिसतात. दोघीही एकमेकांकडे पाहत राहतात. त्यानंतर मांजर कोंबडीवर हल्ला करतं. तिची मान आपल्या पंज्यात धरतं. तितक्यात तिथं जवळ असलेली कोंबडी तिथं धावत येते. मांजरावर ती चोच मारते आणि कोंबडीची सुटका करवून घेते. मांजर त्या कोंबडीला सोडतं आणि थोड्या वेळाने जी कोंबडी वाचवायला आली तिच्यावरच हल्ला करतं. त्यावेळी मग पहिली कोंबडी या दुसऱ्या कोंबडीच्या मदतीसाठी धावून येते. हे वाचा - पाणघोडा आणि सिंह समोरासमोर भिडले; पाहा कोणी जिंकली लढाई, VIDEO यानंतर दोघी कोंबडी मांजरीवर तुटून पडतात. आता आपलं यांच्यासमोर काही चालणार नाही हे मांजराला कळून चुकतं आणि मांजर लढाईतून माघार घेतं. तिथू गप्पपणे पळून कोंबड्यांपासून लांब जातं. कोंबड्यांनी एकत्र येत मांजराला चांगलाच धडा शिकवला आहे. एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलं आहे. फनी व्हिडीओज ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

)







