मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीबाईचा तो डान्स पाहून रूसला नवरदेव; पाहुणेही अवाक होऊन बघत राहिले, VIDEO

नवरीबाईचा तो डान्स पाहून रूसला नवरदेव; पाहुणेही अवाक होऊन बघत राहिले, VIDEO

नवरी आणि नवरदेव यांच्यात जर जबरदस्त डान्स (Bride and Groom Dance) कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यातील एक कोणीतरी नक्कीच असं असतं जे समोरच्याची मस्करी करतं.

नवरी आणि नवरदेव यांच्यात जर जबरदस्त डान्स (Bride and Groom Dance) कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यातील एक कोणीतरी नक्कीच असं असतं जे समोरच्याची मस्करी करतं.

नवरी आणि नवरदेव यांच्यात जर जबरदस्त डान्स (Bride and Groom Dance) कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यातील एक कोणीतरी नक्कीच असं असतं जे समोरच्याची मस्करी करतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : लग्नाच्या सीझनला (Wedding Season) सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरांमध्ये लग्नसमारंभ आहेत ते आतापासूनच तयारीला लागले आहेत. नवरी आणि नवरदेवही आपल्या लग्नाची तयारी करण्यात मग्न आहेत. आपल्या लग्नात धमाकेदार डान्स (Dance Performance in Wedding Function) करण्याची इच्छा अनेक जोडप्यांची असते. यासाठी दोघंही डान्सचा आधीपासूनच सराव करत असतात. काही लोक कोरिओग्राफरकडून डान्स शिकतात तर काहींना स्वतः ठरवलेल्या डान्स स्टेप्सच (Dance Steps) जास्त आवडतात. मात्र, अनेक लोक असेही असतात ज्यांना डान्स करता येत नाही, तरीही ते आपल्या सिग्नेचर स्टेप्स विसरत नाहीत.

'2 मुलांसोबत एकाच सोफ्यावर झोपावं लागतं'; कपलनं थेट प्रशासनाकडे मागितली मदत

नवरी आणि नवरदेव यांच्यात जर जबरदस्त डान्स (Bride and Groom Dance) कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यातील एक कोणीतरी नक्कीच असं असतं जे समोरच्याची मस्करी करतं. वेगवेगळ्या लोकांची आपली एक वेगळी सिग्नेचर स्टेप असते. अशाच एका नवरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरीबाई बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं 'बट पप्पू कान्ट डान्स साला...' वर ठुमके लगावताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरीनं डान्स करायला सुरुवात करताच ती आपल्या पार्टनरकडे इशारा करू लागते. पार्टनरला पाहून नवरीबाईनं डान्स सुरू करताच आसपासचे लोक हसू लागतात. हे यामुळे कारण ती आपल्या पार्टनरला चिडवण्यासाठी त्याची सिग्नेचर स्टेप कॉपी करत असते. हे पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की जेव्हा तुम्ही तुमच्या बालपणीच्या जोडीदारासोबत लग्न करत असता, तेव्हा असा नजारा पाहायला मिळतो. नवरी नवरदेवाची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे.

घराच्या दरवाजातून बाहेर आला भलामोठा कोब्रा अन्...; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

इन्स्टाग्रामवर विटी वेडिंग नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, नवरीला डान्स करताना पाहून नवरदेवाचे हावभाव बदलले.

First published:

Tags: Dance video, Wedding video