Home /News /viral /

VIDEO: अचानक नवरदेवाजवळ बसलेली नवरी उठून पळू लागली; केलं असं काही की सगळे बघतच राहिले

VIDEO: अचानक नवरदेवाजवळ बसलेली नवरी उठून पळू लागली; केलं असं काही की सगळे बघतच राहिले

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लग्नातील या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral on Social Media) दिसतं, की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर बसलेले आहेत.

  नवी दिल्ली 30 ऑगस्ट : आपल्या लग्नात (Marriage) काहीतरी वेगळं करायचं आणि हा खास दिवस आणखीच खास बनवायचा असं प्रत्येक नवरदेव आणि नवरीला वाटत असतं. त्यामुळेच सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी नवरी आणि नवरदेव नेहमीच काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असतात. लग्नात वऱ्हाड्यांना डान्स करताना पाहून कोणालाही डान्स करायची इच्छा होते. मात्र, जर अचानक नवरीनं स्टेजवरून उठून डान्स (Bride Dance Video) केला तर सगळेच थक्क होतील. मात्र, सध्या एका अशाच नवरीचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. अरेच्चा! वेगात आले अन् दुचाकीसह थेट घरातच शिरले युवक; घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लग्नातील या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral on Social Media) दिसतं, की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर बसलेले आहेत. मात्र, इतक्यात नवरदेव आणि तिथे उपस्थित पाहुण्यांना सरप्राईज देण्यासाठी नवरी स्टेजवर उभा राहते. यानंतर नवरीसाठी एक गाणं वाजवलं जातं आणि नवरीबाई त्यावर थिरकू लागते. व्हिडिओ पाहून असं वाटतं, की हे सगळं आधीपासूनच प्लॅन केलं गेलं असावं. नवरीच्या चेहऱ्यावरील हावभाव मन जिंकणारे आहेत.
  VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! तरुणाला भररस्त्यात पट्ट्याने मारहाण इतकंच नाही तर जेव्हा नवरी पळत स्टेजवर आली तेव्हा नवरदेवाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नातील हा व्हिडिओ केरळमधील आहे आणि इथे लग्न एखाद्या सणाप्रमाणे साजरं केलं जातं. इन्स्टाग्रामवर नोज वेडिंग क्रिएशन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत. तर, 43 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Dance video, Wedding video

  पुढील बातम्या