जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! वेगात आले अन् दुचाकीसह थेट घरातच शिरले युवक; घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अरेच्चा! वेगात आले अन् दुचाकीसह थेट घरातच शिरले युवक; घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अरेच्चा! वेगात आले अन् दुचाकीसह थेट घरातच शिरले युवक; घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतं, की एका दुचाकीवर दोघं बसलेले आहेत. मात्र, अचानक अगदी वेगात ते दुचाकीसह एका घरामध्ये शिरतात

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 ऑगस्ट : कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर (Sunil Grover) आपल्या धमाकेदार अभिनयासोबतच कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठीही प्रसिद्ध आहे. सुनिल सोशल मीडियावर (Social Media) बराच सक्रीय असतो आणि सतत तो आपल्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडिओ (Funny Videos) आणि फोटो शेअर करत असतो. या व्हिडिओंना त्याच्या चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळते. सध्या सुनिलनं शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्या माकडाला पाहून घाबरला बिबट्या; समोर दिसताच ठोकली धूम, पाहा VIRAL VIDEO व्हिडिओमध्ये दिसतं, की एका दुचाकीवर दोघं बसलेले आहेत. मात्र, अचानक अगदी वेगात ते दुचाकीसह एका घरामध्ये शिरतात. कॉमेडियननं हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्यानं याला कॅप्शन दिलं आहे, ’ पीया घर आया’. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घराचं गेट उघडलेलं असतं. तितक्यात तिथे दोन युवक दुचाकीवर बसून येतात आणि त्यांचा ताबा सुटल्यानं थेट घरात शिरतात. अवघ्या 9 सेकंदाचा हा व्हिडिओ 24 तासात 7 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! तरुणाला भररस्त्यात पट्ट्याने मारहाण सोशल मीडियावर या व्हिडिओ नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की मला वाटतंय कदाचित घराचं पार्किंग आतमध्ये असेल. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की पार्किंगचा हा स्टंट यांच्याकडूनच शिकावा लागेल. व्हिडिओमध्ये दिसतं, की दोघं दुचाकीवरून जात आहेत मात्र अचानक बॅलन्स बिघडतो आणि ते एका घरात शिरतात. हा व्हिडिओ पाहून एका यूजरनं लिहिलं, की ‘चौक पुराओ मंगल गाओ.’ आणखी एकानं लिहिलं, की रामजी यांना वाचवा. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात