जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! कधी गाडीला बांधून फरफटत नेलं, तर कधी भररस्त्यात पट्ट्याने मारहाण

VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! कधी गाडीला बांधून फरफटत नेलं, तर कधी भररस्त्यात पट्ट्याने मारहाण

VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! कधी गाडीला बांधून फरफटत नेलं, तर कधी भररस्त्यात पट्ट्याने मारहाण

या व्हिडीओमध्ये तरुणाला पट्ट्याने मारहाण केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागांमधून मारहाणीच्या अनेक घटना समोर येत आहेत. चोरी किंवा तत्सम कारणांमुळे मारहाणीच्या घटनांचे व्हिडीओ (Shocking Video) पाहताना मन सुन्न होतं. रीवा भागातून एक अत्यंत घृणास्पद व्हिडीओ समोर आला आहे. रीवातील सिव्हील लाइन पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. अवैध्य व्यवसायाशी संबंधित लोकांनी चोरीच्या संशयाखाली तरुणाला मारहाण केली आहे. या तरुणाला बेल्टने मारहाण केली जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही मारहाण पाहून तालिबान्यांची आठवण येत आहे. (VIDEO People forget humanity The young man was severely beaten with a belt) दुर्देवाने आजूबाजूचे लोक हा तमाना पाहत उभे आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा- मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली 2महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना

28 ऑगस्ट रोजी नीमच येथे घडलेल्या एका घटनेत एका तरुणाला काही जणांनी भररस्त्यात पिकअप वाहनाच्या मागे बांधून फरफटत नेलं. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 8 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ज्यामध्ये मुख्य आरोपीचादेखील समावेश आहे. चोरी केल्याच्या संशयाखाली या तरुणाला तालिबानी शिक्षा देण्यात आली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या संशयावरुन आदिवासी तरुणाला इतक्या क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. त्याला इतकं मारलं की यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात