इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही मुलं ग्रुम्समेन्स आहेत. लग्नात नवरदेवाच्या बाजून ग्रुम्समेन्स आणि नवरीच्या बाजूने ब्राइड्समेड्स असतात. जे लग्नात प्रत्येक ठिकाणी नवरा आणि नवरीसोबत असतात. यामध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी किंवा जवळचे नातेवाईक असतात. हे वाचा - VIDEO:लग्नमंडपातच मेहुणीने धरले दाजीचे पाय; संतापलेल्या वराने घेतला भलताच निर्णय एरवी नवरी आपल्या ब्राइड्समेडसोबत दिसते. लग्नात एंट्री मारतानाही तिच्यासोबत ब्राइड्समेड्स असातत. पण या नवरीला मात्र ग्रुम्समेन्ससोबतही जायचं होतं. तिची ही इच्छा पूर्ण झाली आणि हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पोस्टमधून नवरीने तिची इच्छा पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding video