नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : लग्नात (Marriage) सर्वाधिक मस्ती दाजी आणि मेहुणी करत असतात. पाहुण्यांची नजर सतत नवरदेव आणि नवरीवर (Groom and Bride) असतेच. मात्र यासोबतच लग्नातील नवरदेवाच्या चपला चोरण्याचा खेळही पाहुणे आवर्जुन बघत असतात. यानंतर मेहुणी जेव्हा चपल्ल परत देण्यासाठी आपल्या दाजीकडे पैसे मागते तेव्हा अनेकदा चेष्टा मस्करी सुरू असते. अनेकदा मेहुणी आपल्या दाजीला खूश करण्यासाठी खास परफॉर्मन्सही करते.
युवकानं नवरी-नवरदेवाला उचललं अन् धाडकन जमिनीवर आपटलं, पाहा विचित्र VIDEO
सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात मेहुणीनं लग्नातच डान्स फ्लोअरवर परफॉर्मन्स (Dance Performance in Wedding) केला. डान्स परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर केवळ दाजीच नाही तर तिची बहिणही उपस्थित होती.
View this post on Instagram
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध 'मेरे जीजा जी...' गाण्यावर धमाकेदार डान्स करत मेहुणीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. स्टेजवरच तिनं बहिणीसोबत उभा असलेल्या दाजीचा हात पकडला आणि दाजीला डान्स फ्लोअरवर घेऊन आली. तिनं या गाण्यावर स्टेप वाईज डान्स करण्यास सुरुवात केली.
रुसलेल्या नवरदेवाचे स्टेजवर भलतेच नखरे; लग्नाच्या दिवशीच नवरीचा हिरमोड, Video
मेहुणीनं डान्ससाठी बोलवताच नवरदेव आधी हसू लागला आणि नंतर हसत हसतच डान्स करू लागला. त्यांचा हा डान्स व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. यादरम्यान नवरदेवाचा मेहुणाही तिथेच उपस्थित होता आणि त्यांच्यासोबतच डान्स करताना दिसला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर लीना कटारिया नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Video) शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला भरपूर लाईक्स मिळत आहेत. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Wedding video