मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: संतापजनक! दलित तरुणाला जात विचारत बेदम मारहाण; टोळक्यानं गुप्तांगावरही केला हल्ला

VIDEO: संतापजनक! दलित तरुणाला जात विचारत बेदम मारहाण; टोळक्यानं गुप्तांगावरही केला हल्ला

व्हिडिओमध्ये काही लोक दलित तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. दलित युवकानं आपली जात त्यांना सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

व्हिडिओमध्ये काही लोक दलित तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. दलित युवकानं आपली जात त्यांना सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

व्हिडिओमध्ये काही लोक दलित तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. दलित युवकानं आपली जात त्यांना सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.

कानपूर 10 जुलै : एका दलित युवकावर झालेल्या अत्याचारांचं संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) देहात येथील एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक दलित तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. दलित युवकानं आपली जात त्यांना सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. आरोपींनी युवकाला प्रचंड मारहाण केली. यासोबतच त्याच्या गुप्तांगावर काठीने हल्ला केला. जखमी अवस्थेत या युवकाला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं, की आरोपी दलित तरुणाला त्याची जात विचारत आहेत. यानंतर आरोपींनी युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

डॉक्टरनं 16 वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे अन्...; नागपूरातील संतापजनक घटना

त्याला काठीनंही अमानुष मारहाण केली गेली. इतकंच नाही तर त्याच्या गुप्तांगावरही वार केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.

पीडित युवक वेदनंन अक्षरशः ओरडत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी कानपूर देहातमधील अकबर पुर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.

15दिवसांपूर्वी कामासाठी आला अन् कायमचा संपला;रुममेटनं चेहरा जाळून गुप्तांग कापलं

प्रेमाच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं, की व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये युवकाला मारहाण करताना दिसणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आणखी दोन लोक त्याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या आहेत. पीडित युवकाला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Crime news, Dalit, Shocking video viral, Uttar pradesh