नागपूर, 10 जुलै: रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी (Minor girl) अश्लील चाळे (Sexual molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागपूर शहरातील नंदनवन पोलिसांत विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरचे आणि रुग्णालयाचं नाव गुपित ठेवलं असून या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित घटना नागपूरातील सद्भावनानगर परिसरातील एका रुग्णालयात घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय पीडित मुलीची प्रकृती खराब झाल्यानं ती आपल्या आईसोबत बुधवारी रात्री आठच्या सुमारास संबंधित रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. याठिकाणी डॉक्टरनं पीडितेची तपासणी करून तिला सलाइन लावली.
हेही वाचा-अल्पवयीन प्रियकराने विवाहितेसह दोन मुलांना पाजले विष आणि मग...
काही वेळानं पीडितेची आई रुग्णालयाबाहेर गेली असता, 35 वर्षीय आरोपी डॉक्टर पीडितेजवळ आला. त्यानं तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच घटनेची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आणि आरोपी डॉक्टरनं तिला डिस्चार्ज दिला. यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर पीडितेनं नंदनवन पोलीस ठाण्यात जावून आरोपी डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 15 दिवस भाड्याच्या खोलीत ठेवलं अन्...
या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयाचं नाव पोलिसांनी जाहीर केलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत. पीडित मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur, Sexual harassment