मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /Aurangabad: 15 दिवसांपूर्वी कामासाठी आला अन् कायमचा संपला; रुममेटनं चेहरा जाळून गुप्तांगही कापलं

Aurangabad: 15 दिवसांपूर्वी कामासाठी आला अन् कायमचा संपला; रुममेटनं चेहरा जाळून गुप्तांगही कापलं

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक तरुणानं आपल्या रुममेटची निर्घृण हत्या (Roommates Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक तरुणानं आपल्या रुममेटची निर्घृण हत्या (Roommates Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक तरुणानं आपल्या रुममेटची निर्घृण हत्या (Roommates Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाळूज, 10 जुलै: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक तरुणानं आपल्या रुममेटची निर्घृण हत्या (Roommate brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 दिवसांपूर्वी कामानिमित्त वाळूज याठिकाणी आलेल्या तरुणाची त्याच्याच एका रुममेटनं हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून आरोपीनं मृत तरुणाचा चेहरा जाळला (Burned face) आणि त्याचं गुप्तांगही (Cut off his genitals) कापलं आहे. 3 जुलै रोजी एका विहिरीत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. तसेच मृताची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत खूनाचं गूढ उलगडलं असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सुधाकर आनंदा वारांगणे असं हत्या झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव असून तो सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील रहिवासी आहे. मृत सुधाकर 15 दिवसांपूर्वी कामानिमित्त वाळूज याठिकाणी आला होता. त्याला याठिकाणी एका कंपनीत नोकरी देखील मिळाली होती. पण अवघ्या पंधरा दिवसांतच आरोपीनं कोणत्या तरी कारणावरून त्याची निर्घृण हत्या केली आहे. मोहंमद हुसेन असं आरोपीचं नाव असून तो मोहंमद रिझवान नावाने वाळूज परिसरात राहत होता.

हेही वाचा-मुंबईत दिरानंच विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, धक्कादायक कारण आलं समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुधाकर हा वाळूज येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या दिनेश बंसकार, विनीत बशोत, बन्सीलाल चामार आणि आरोपी मोहंमद रिझवान यांच्यासोबत एका रुममध्ये राहत होता. 2 जुलै रोजी सुधाकरचा पाय मुरगळल्यानं तो कामावर गेला नाही. तर त्यादिवशी आरोपी रिझवाननं देखील सुट्टी घेतली आहे. तर अन्य दोघं नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सुधारणचा पाय मुरगळल्यानं तो रिझवानकडे मालिश करण्यासाठी गेला होता.

हेही वाचा-धक्कादायक! अनैतिक संबधातून रचला कट; 6जणांनी घरात घुसून विवाहित महिलेला पाजलं विष

यानंतर, दोघांत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून रिझवाननं सुधाकरची हत्या केली. पुरावा मिटवण्यासाठी आरोपीनं सुधाकरचा चेहरा जाळला आणि गुंप्तांग देखील कापलं. जवळच्या एका विहिरीत मृतदेह टाकून आरोपी फरार झाला. याप्रकरणी 3 जुलै रोजी सुधाकरचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मृताची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे.

हेही वाचा-अल्पवयीन प्रियकराने विवाहितेसह दोन मुलांना पाजले विष आणि मग...

घटनेच्या दिवसापासून रिझवान रुममधून गायब असल्याची माहिती पोलिसांना त्याच्या अन्य रुममेटनं दिली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेतं आहेत. पण आरोपीनं त्याचा मोबाइल फोन देखील एका तरुणाला विकला होता. त्यामुळे मोबाइल नसणाऱ्या या आरोपीला शोधणं पोलिसांसमोर एक आव्हान बनलं आहे. याप्रकरणी पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Murder