मुंबई 09 जानेवारी : सोशल मीडियावर कधी कधी असे काही व्हिडीओ व्हायरल होतात. जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात आणि त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल. हा व्हायरल व्हिडीओ एका अस्वलाचा आहे. या व्हिडीओमध्ये हा अस्वल काही तरी खाताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं तो प्राणी जगण्यासाठी खाणारच तो. पण थांबा, खरी गंमत तर पुढे आहे. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video आता तुम्ही स्वत:च्याच बाबतीत घ्या ना, मंदिरात आपल्याला प्रसाद मिळाला तर तो एकदा खाऊन आपलं मन भरत नाही, आपल्याला तो पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. हेच खरंतर या अस्वला सोबत देखील झालं आहे. या अस्वलाने एकदा एका यज्ञ शाळेत येऊन प्रसाद खाल्ला होता. यानंतर या अस्वलाला हा प्रसाद खाण्याचा रोज मोह होऊ लागला. यानंतर हा अस्वल रोजच या यज्ञशाळेत प्रसाद खाण्यासाठी येऊ लागला असं देखील लोकांनी सांगितलं. तुम्ही अस्वलाचा आधी का व्हिडीओ पाहा, प्रसाद खाणारा अस्वल पाहून तुम्हाला नक्कीच कुतुहल वाटेल.
छत्तीसगढच्या मरवाहीमधील नरौर गावात सध्या रुद्र यज्ञ सुरु आहे. या यज्ञाचा प्रसाद खाण्यासाठी चक्क अस्वलाने हजेरी लावली. रात्री अस्वल यज्ञमंडपात आलं आणि प्रसाद खाऊन पुन्हा जंगलात गेलं. त्यानं हे एकदा केलं नाही, तर आता हा अस्वल सारखाच या यज्ञशाळेत येतोय आणि प्रसाद खाऊन पुन्हा चुपचाप आपल्या घरी परत जातोय. एका भाविकाने हा प्रकार हळूच कॅमेऱ्यात कैद केलाय.
या यज्ञाचा आज (9 जानेवारी) शेवटचा दिवस आहे. तेव्हा आता हे यज्ञ संपल्यावर अस्वल काय करणार? याची चर्चा सुरु आहे.