मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! झटपट हेअर कटिंगसाठी केला असा जुगाड, काही सेकंदातच निम्मे केस गायब; पाहा VIDEO

OMG! झटपट हेअर कटिंगसाठी केला असा जुगाड, काही सेकंदातच निम्मे केस गायब; पाहा VIDEO

केस कापण्यासाठी डोक्यावर काय फिरवलं पाहा.

केस कापण्यासाठी डोक्यावर काय फिरवलं पाहा.

केस कापण्यासाठी डोक्यावर काय फिरवलं पाहा.

मुंबई, 16 ऑक्टोबर : सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट अगदी झटपट हवी असते. अगदी केस कापण्यातही (Hair cutting) लोकांना आपला वेळ घालवायचा नाही (Desi jugaad video). त्यामुळे कमीत कमी वेळेत झटपट केस कसे कापता (Hair cutting video) येतील, यासाठी लोक प्रयत्न करतात. सामान्यपणे हेअरकटिंगसाठी कात्री, वस्तरा यांचा वापर होतो (Hair cutting jugaad video). पण एका व्यक्तीने पटापट केस कापायचे म्हणून यापैकी काहीच वापरलं नाही. त्याने चक्क गवत कापण्याचं मशीनच डोक्यावर फिरवलं (Hair cutting with grass cutting machine).

गवत कापण्याच्या मशीनने हजामत करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्यक्तीने केस कापण्यासाठी जो जुगाड केला तो पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. आपण विचारही करू शकत नाही अशी ट्रिक केस कापण्यासाठी वापरण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Desi Swaad (@desi_swaad0)

व्हिडीओत पाहू शकता एका तबेल्यावर दोन व्यक्ती आहेत, एक व्यक्ती खाली बसली आहे आणि एक व्यक्ती उभी आहे. उभी असलेली व्यक्ती न्हावी आहे. तर बसलेली व्यक्ती या न्हाव्याकडे केस कापायला आली आहे.

हे वाचा - OMG! खाली खोल दरी, तरी उभं राहून तारेवरून सुसाट पळवली बाईक; खतरनाक STUNT VIDEO

न्हाव्याच्या हातात तुम्हाला कात्री, वस्तरा असं काहीच दिसत नाही तर चक्क गवत कापण्याचं मशीन दिसतं आहे. हे मशीन त्या व्यक्तीने खाली बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ठेवलं आहे आणि गवत कापावं तसं तो भरभर केस कापतो आहे. अगदी एका फटक्यात केस डोक्यावरून निघत आहेत आणि डोकं तुळतुळीत होत आहेत. काही सेकंदात डोक्यावरील केस गायब झाले आहे. केस कापण्याची ही खूप विचित्र स्टाईल आहे. केस कापण्याचा न्हाव्याचा हटके अंदाज पाहून केस कापणाऱ्या व्यक्तीला हसू आवरलं नाही.

हे वाचा - अरे आंटी जी! महिलेचा सर्वांसमोर 'खटिया तोड' डान्स; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

desi_swaad0 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos