मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्यानं स्वतःच केलं गार्डनिंग; आधी खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी, पाहा VIDEO

कुत्र्यानं स्वतःच केलं गार्डनिंग; आधी खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी, पाहा VIDEO

तुम्ही कधी कुत्र्याला गार्डनिंग (Gardening) करताना पाहिलंय? सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा (Viral Video of a Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  नवी दिल्ली 15 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Photos and Videos of Animals) होताना दिसतात. आपण सर्वांनी माकड, मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना डान्स (Animal Dance Videos) करताना आणि खेळताना पाहिलं असेल. ट्रेनिंगनंतर परफॉर्म करणाऱ्या अशा अनेक प्राण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला गार्डनिंग (Gardening) करताना पाहिलंय? सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा (Viral Video of a Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात हा कुत्रा गार्डनिंग करताना दिसत आहे. हा क्यूट व्हिडिओ तुमच्याही पसंतीस उतरेल. Bride Video: ना कपड्यांची चिंता ना मेकअपची;लिफ्टमध्ये जमिनीवर बसून नवरीची पार्टी प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपल्या प्राण्यांना घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच ठेवतात. हे प्राणीदेखील आपल्या मालकाची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आपल्या मालकीणीसोबत बागेत काम करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये सांगितलं गेलं आहे, की मार्चमध्ये सीक्रेट नावाच्या एका कुत्र्यानं एक बटाट्याचं झाड लावलं. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो हे रोप लावण्यासाठीची तयारी करताना आणि जमीन खोदताना दिसत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला एक सुंदर सरप्राईजही मिळेल.
  VIDEO : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर my_aussie_gal नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मनं जिंकत आहे. आतापर्यंत 1.7 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नेटकरी या कुत्र्याचं भरपूर कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की तो पाहून तुमचाही मूड चांगला होईल.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video viral, Viral video on social media

  पुढील बातम्या