Home /News /viral /

हुश्शार कावळा! तहान भागवण्यासाठी पक्षाने चालवलं डोकं, VIDEO पाहून व्हाल अवाक

हुश्शार कावळा! तहान भागवण्यासाठी पक्षाने चालवलं डोकं, VIDEO पाहून व्हाल अवाक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कावळा कुठून तरी चालत नळाच्या जवळ येतो. त्याला भरपूर तहान लागलेली असते. यामुळे तो उडून नळावर जाऊन बसतो.

    नवी दिल्ली 22 जानेवारी : तहानलेल्या कावळ्याची कथा तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. यात एक कावळा अगदी कडक उन्हात आपली तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधात इकडे-तिकडे फिरत असतो. यावेळी त्याची नजर एका पाण्याच्या घड्यावर पडते. कावळ्याने तिथे जाऊन पाहिलं असता त्याला दिसतं की घड्यात पाणी तर आहे, मात्र ते घड्याच्या अगदी तळाला असल्याने त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नाही. यानंतर हुशार कावळ्याने डोकं चालवलं आणि शेजारी पडलेले दगड उचलून त्याने या घड्यात टाकण्यास सुरुवात केली. यानंतर पाणी वरती आलं आणि मग कावळ्याने आरामात हे पाणी पिलं. तोंडात काठी पकडून श्वानाने केली तरुणीची धुलाई; VIDEO पाहून हैराण झाले नेटकरी या कथेवरुन इतकं तर लक्षात येतं की कावळ्याकडेही डोकं असतं, ज्याचा वापर तो वेळ आल्यावरच करतो. मात्र, आता काळ बदलला तसं हे कावळेही बदलले आहेत. तुम्ही कधी कावळ्याला नळ सुरू करून पाणी पिताना पाहिलंय का? कदाचित याचं उत्तर नाहीच असेल. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of a Crow) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कावळा स्वतः नळ चालू करून पाणी पिताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कावळा कुठून तरी चालत नळाच्या जवळ येतो. त्याला भरपूर तहान लागलेली असते. यामुळे तो उडून नळावर जाऊन बसतो. यानंतर आपल्या पायाने आणि चोचीच्या मदतीने तो नळ चालू करतो आणि पाणी पिऊ लागतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. कारण कावळ्याला कसं समजलं की नळ कसा चालू करतात. असंही शक्य आहे की त्याने एखाद्या माणसाचं पाहून हे केलं असावं किंवा मग गरज पडल्यावर कदाचित पक्षीही आपल्या डोक्याचा वापर करून आपल्या गरजा पूर्ण करतात. नातेवाईकांनी पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकले पैसे, वरातीत नोटांचा सडा, VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Vidurji नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, 'जल जीवन मिशन- हर घर जल. प्रत्येक घरात शुद्ध नळाचं पाणी. कोणीही सरळ या नळाचं पाणी पिऊ शकतं'. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Video Viral On Social Media

    पुढील बातम्या