मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL

लग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL

लग्नानंतरचं सोडा नवरा-नवरी (Groom bride video) लग्नातच भांडू लागले आहेत.

लग्नानंतरचं सोडा नवरा-नवरी (Groom bride video) लग्नातच भांडू लागले आहेत.

लग्नानंतरचं सोडा नवरा-नवरी (Groom bride video) लग्नातच भांडू लागले आहेत.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 31 ऑगस्ट : नवरा-बायकोची (Husband wife) भांडणं तशी नवीन नाहीत. पण किमान लग्नानंतर (Wedding video) काही महिने अगदी प्रेमात, सुखात जातात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात लग्नानंतरचं सोडा नवरा-नवरी (Groom bride video) लग्नातच भांडू लागले आहेत. चक्क एका केळ्यासाठी नवरा-नवरीमध्ये जुंपली (Groom bride fight for banana).

लग्नात छोटेमोठे वाद होत असतात. पण ते शक्यतो वर-वधू पक्षातील मंडळींमध्ये असतात. नवरा-नवरीमध्ये लग्नात क्वचितच वाद होतात. पण हा वाद केळ्यावरून असू शकतो, याचा आपण कधी विचारही केला नसेल. हे काय भांडणाचं कारण आहे, का? असंच आपल्याला वाटेल.

केरल वेडिंग स्टाइल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. स्टेजवर खाणाऱ्यांची ही शानदार जोडी, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हे वाचा - VIDEO- पाय धरून अख्खा खिसाच कापला; नवरीकडून पाया पडून घेणं नवरदेवाला पडलं महागात

व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरीचं फोटोशूट सुरू आहे. नवरदेव खुर्चीवर बसला आहे आणि नवरी खाली स्टेजवर बसली आहे. दोघांनीही फोटोसाठी पोझ दिली आहे. नवरीच्या हातात केळं आहे, ती केळं खाताना दिसते आहे. नवरी केळं सोलते आणि खाणार इतक्यात नवरदेव तिच्या हातातलं केळं काढून घेतो आणि स्वतः खाऊ लागतो. मग नवरी तिच्या शेजारी असलेल्या केळ्याच्या घडातून आणखी एक केळं काढून घेते, ते सोलून खाते. तेव्हासुद्धा नवरदेव तिच्या हातातलं केळं खेचून ते खातो.

हे वाचा - नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

नवरीला रागच येतो. ती काय चाललं आहे, असं रागाने त्याला विचारतानाही दिसते. नवरा मात्र आपल्याच धुंदीत आहे. तो समोर कुणाशी तरी बोलता बोलता केळं खात राहतो. नवरीकडे लक्षही देत नाही. हा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video