दुबई, 31 ऑगस्ट : वडापाव (Vadapav) म्हटलं की समोर येते ती मुंबई. मुंबईचा वडापाव (Mumbai vadapav) फक्त राज्यात, देशात नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. तसं बहुतेक ठिकाणी वडापाव खायला मिळतो, पण त्या वडापावला मुंबईच्या वडापावसारखी चव नसते. असं असताना दुबईतल्या वडापावची (Dubai vadapav) चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगते आहे आणि याचं कारण म्हणजे या वडापावची किंमत. मुंबईत आपल्याला वडापाव 12 रुपयाला मिळतो. फार फार तर चांगल्या रेस्टॉरंटमध्ये शंभर रुपये पकडा. पण दुबईत एक वडापाव काही शे नव्हे तर हजारो रुपयांना विकला जातो आहे. एका वडापावची किंमत तब्बल 2000 रुपये (Rs. 2000 vadapav) आहे. काय किंमत वाचूनच धक्का बसला ना?
#Gold_Vada_Paav This is what's wrong with the world: too many rebels without a cause. pic.twitter.com/JKeKsgOLEo
— Masarat Daud (@masarat) August 30, 2021
आता म्हणाल या वडापावमध्ये इतकं काय खास आहे. या वडापाव गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे यावर 22 कॅरेट सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. ज्यामुळे याची किंमत इतकी आहे. ट्रफल बटर आणि चीजही यामध्ये वापरण्यात आलं आहे. हे वाचा - OMG! फक्त एक Hot Dog सुद्धा लाइफवर भारी; कमी करतोय तुमच्या आयुष्याची 36 मिनिटं मशरद दाऊद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या वडापावचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. आता तुम्हीच सांगा दुबई की मुंबई कोणत्या वडापाव तुम्हाला खायला आवडेल.