• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: घरात 8 फुटाची मगर शिरताच सगळ्यांची उडाली धांदल; पाहा पुढे काय घडलं

VIDEO: घरात 8 फुटाची मगर शिरताच सगळ्यांची उडाली धांदल; पाहा पुढे काय घडलं

एका घरात थेट आठ फूट लांब मगरीनं एन्ट्री (Crocodile Entered in Home) केली. हे पाहून घरातील लोकांची धांदल उडाली. घरात मगर शिरल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे.

 • Share this:
  जयपूर 04 ऑगस्ट : मगरीचं (Crocodile) नाव ऐकलं तर कित्येकांच्या अंगावर काटा येतो. अशात अचानक मगर तुमच्या घरात घुसली तर ? अशीच एक घटना नुकतीच राजस्थानच्या (Rajasthan) सवाई माधोपुर येथे घडली आहे. इथे एका कुटुंबाच्या घरात थेट आठ फूट लांब मगरीनं एन्ट्री (Crocodile Entered in Home) केली. हे पाहून घरातील लोकांची धांदल उडाली. घरात मगर शिरल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. ST चालकाच्या विचित्र ड्रायव्हिंगचा VIDEO व्हायरल, धडकेत दुचाकी चालक जखमी कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना पाहून परिसरात खळबळ उडाली, यानंतर वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर एकदम आरामत फिरताना दिसत आहे. मात्र, तिला पकडण्यासाठी मगरीवर दोरी टाकली जाते, तेव्हा ती वेगानं फिरू लागते. आसपास उभा असलेले लोक ही संपूर्ण घटना पाहत आहेत. मात्र, मगर जोरानं फिरू लागताच हे सर्व तिथून पळ काढतात. स्टेजवरच नवरीनं केलं असं काही की लाजला नवरदेव; कपलचा Romantic Video व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मगर एकदम आरामात फिरत आहे. जसं की हे तिचंच घर आहे. तर, ज्यांच्या घरात मगर शिरली आहे, ते मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी छतावर जाऊन उभा राहिले आहेत. चांगली गोष्ट ही आहे, की वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचायला जास्त वेळ लावला नाही. यामुळे मगरीला किंवा कोणत्या व्यक्तीलाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. वनविभागालाही या मगरीला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, अनेक तासाच्या प्रयत्नांनंतर या मगरीला पकडण्यात यश आलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: